शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! आता LIC शी निगडीत सर्व कामे घरबसल्या शक्य; कसे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 6:38 PM

1 / 12
भारतातील सर्वांत मोठी विमा कंपनी म्हणून LIC कडे पाहिले जाते. देशभरात LIC अत्यंत लोकप्रिय आहे. कोट्यवधी ग्राहक असलेल्या LIC चा पसाराही मोठा आहे. एवढेच नव्हे, तर LIC च्या पॉलिसींची संख्याही हजारोंच्या घरात आहे.
2 / 12
LIC पॉलिसीबाबत कोणतेही काम असल्यास आपल्याला एकतर एजंटला तरी पकडावे लागते किंवा मग सरळ LIC ची जवळची शाखा गाठावी लागते. LIC शी निगडीत कोणतेही काम सुलभपणे होत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. (know everything about lic policy and premium through lic customer app)
3 / 12
आता मात्र LIC ने ग्राहकांच्या सोयीसाठी ‘LIC Customer’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन आणले आहे. हे अ‍ॅप अँड्राइड आणि आयओएस या दोन्ही मोबाइल डिव्हाइसवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये LIC शी निगडीत सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला असून, ते वापरण्यास सोपे असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 12
LIC Customer या अ‍ॅपमध्ये कंपनीच्या नवीन पॉलिसी, नवीन स्कीम यांच्या माहितीसह प्रीमियम कॅल्युलेटरसारखे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एकाच अ‍ॅपमध्ये आपण अनेक प्रकारची माहिती घेऊ शकतो, असे सांगितले जाते.
5 / 12
android युझर्ससाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये आणि आयफोन युझर्ससाठी ios स्टोअरमध्ये LIC Customer हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये विविध सेक्शन्स असून, इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे.
6 / 12
LIC Customer अ‍ॅपमध्ये ‘Know Our Products’ हे पहिले सेक्शन आहे. यामध्ये एलआयसीच्या विविध पॉलिसी, योजना यांबाबत आपल्याला माहिती घेता येऊ शकते.
7 / 12
यानंतर ‘Quick Services’ नामक दुसऱ्या सेक्शनमध्ये प्रीमियम कॅल्युलेटर, ऑफिस लोकेटर, नवीन पॉलिसी खरेदी करण्यासंदर्भात माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. याचा LIC चे युझर्स अनेक कारणांसाठी उपयोग करून घेऊ शकतात, असे सांगितले जाते.
8 / 12
LIC Customer अ‍ॅपमध्ये ‘Registered Portal Users’ नावाचे तिसरे सेक्शन आहे. याचा वापर करून ग्राहक लॉग इन करून शकतात. यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी आणि पासवर्ड सादर करणे गरजेचे आहे. यानंतर अगदी सुलभतेने आपण या अ‍ॅपचा वापर करू शकाल, असे सांगितले जाते.
9 / 12
LIC अ‍ॅपमधील यानंतर चौथे सेक्शन म्हणजे ‘New User Registration’ नामक आहे. अ‍ॅपचा प्रथम वापर करण्यांसाठी हे सेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सेक्शनमध्ये काही माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
10 / 12
चौथ्या सेक्शनमध्ये जी माहिती सादर करायची आहे, त्यात LIC पॉलिसी नंबर, इंस्टॉलमेंट प्रीमियम, जन्मदिनांक, ईमेल आयडी, पॅन आणि पासपोर्ट नंबर देणे अनिवार्य आहे. यापैकी पॅन आणि पासपोर्ट नंबर ऑप्शनल आहे.
11 / 12
LIC अ‍ॅपमध्ये सर्व माहिती भरून झाल्यानंतर लॉग इन केले की, आपल्याला आपल्या पॉलिसी संदर्भातील सर्व माहिती मिळू शकेल. तसेच पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी ‘Online Payments’ चा ऑप्शनही देण्यात आलेला आहे.
12 / 12
LIC अ‍ॅपमधील ‘Online Payments’ चा उपयोग करून प्रीमियम भरल्यानंतर त्याची रिसीटही लगेच उपलब्ध होते. ही पावती मात्र डाऊनलोड करावी लागेल. तसेच या अ‍ॅपमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावर असलेल्या पॉलिसींची नोंदही करता येऊ शकते.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल