शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अवघ्या 2 मिनिटांत डाऊनलोड करू शकता तुमचं रेशन कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 3:12 PM

1 / 8
तुमचं रेशनकार्ड जर तुम्हाला सापडत नसेल तर चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही ते आता डिजिटल माध्यमातूनही डाऊनलोड किंवा पाहू शकता. विशेष म्हणझे, तुम्ही कोणत्याची राज्यात राहत असाल तरी तुम्हाला तुमचं रेशनकार्ड एकाच संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकतं.
2 / 8
तुम्ही कोणत्याही राज्यात वास्तव्याला असाल तरी तुम्ही 'वन नेशन, वन रेशन'च्या माध्यमातून तुमचं रेशनकार्ड डाऊनलोड करू शकता. डिजिटल माध्यामातून डाऊनलोड केलेलं रेशनकार्ड घेऊन तुम्ही रेशन दुकानात जाऊन अन्नधान्य देखील घेऊ शकता. डिजिटल रेशन कार्ड नेमकं कसं डाऊनलोड करायचं हे आपण जाणून घेऊयात...
3 / 8
रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वातआधी nfsa.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला रेशन कार्ड असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यात दोन पर्याय दिसतील. पहिला View Ration Card Dashboard आणि दुसरा पर्याय Ration Card Details On State Portals असा असेल.
4 / 8
Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्व राज्यांची नावं दिसतील. त्यात तुमचं राज्य निवडा.
5 / 8
राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर रेशन कार्डशी संबंधित आकडे दिसतील. यात तुम्हाला Rural किंवा Urban या दोन पर्यांयामधील योग्य पर्याय निवडावा लागेल.
6 / 8
त्यानंतर तुमचा ब्लॉक, तहसील, गाव किंवा वॉर्डाची माहिती उपलब्ध होईल. तुमच्या राहत्या पत्त्यानुसार पर्याय निवडा आणि तुम्हाला तुमच्या वॉर्डातील किंवा गावातील सर्व रेशन कार्ड दिसू लागतील.
7 / 8
तुम्हाला तुमचं रेशन कार्ड यातून निवडावं लागेल. त्यात तुम्हाला तुमची आणि कुटुंबियांची संपूर्ण माहिती दाखवली जाईल. यात फोटो, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि त्यांची नावं सर्व माहितीची नोंद दिसेल.
8 / 8
तुमच्या रेशन कार्डची शाहनिशा झाल्यानंतर तुम्हाला खालीच प्रिंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमचं डिजिटल रेशन कार्ड प्रिंट करू शकता.
टॅग्स :digitalडिजिटलCentral Governmentकेंद्र सरकार