know who viewed your facebook profile find stocker in 5 easy steps
तुमचं Facebook प्रोफाईल कोण गुपचूप पाहतंय हे माहित्येय का?, 'या' ट्रिक्सच्या मदतीने मिळेल स्टॉकरचा पत्ता By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 4:48 PM1 / 10फेसबुक हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांचा बराचसा वेळ हा त्यांच्या ऑनलाईन मित्रांसह आणि इतर गोष्टींमध्ये घालवत असतात. एखादी व्यक्ती कुठूनही तुमचं फेसबुकवरीव प्रोफाईल पाहू शकतं. 2 / 10काही जण गुपचूप आपंल प्रोफाईल चेक करत असतात. त्यांच्या उद्देश हा वेगवेगळा असू शकतो. मात्र कोणी कोणी आपलं प्रोफाईल चेक केलंय याची माहिती सहज मिळवणं शक्य आहे. यातून आपण सतर्क होऊ शकतो. 3 / 10फेसबुकवर युजर्सना आपलं प्रोफाईल लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पण काहींना याबाबत माहिती नाही. त्यामुळे काहींना आपल्या अकाऊंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न पडतात. अशांना ही पद्धत सोयीची ठरणार आहे. 4 / 10कोणती व्यक्ती आपली प्रोफाईल नेहमी स्टॉक करतं. तसेच तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं अथवा कोण पाहतंय? हे जाणून घेण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. ते जाणून घेऊया...5 / 10सर्वात आधी Facebook.com वर जाऊन वेबवर तुमचं फेसबुक अकाऊंट ओपन करा. यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राऊझरचा वापर करू शकता. 6 / 10तुम्ही तुमच्या फेसबुक पेज किंवा टाईमलाईनवर पोहोचलात की राईट क्लिक करा आणि व्ह्यू पेज सोर्सवर क्लिक करा.7 / 10फेसबुक सोर्स पाहण्यासाठी राईट क्लिक करुन Page व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. पेज सोर्स ओपन झाल्यावर ‘CTRL + F’ वर टॅप करा.8 / 10आता सर्च बारवर जाऊन ‘BUDDY_ID’ टाईप करा आणि एंटर बटणावर क्लिक करा. तिथे ‘BUDDY_ID’ च्या शेजारी अनेक फेसबुक प्रोफाईल आयडी पाहायला मिळतील.9 / 10‘BUDDY_ID’ च्या शेजारी एक एक 15 अंकी कोड दिसेल तो कोड कॉपी करा आणि दुसऱ्या पेजवर फेसबुक ओपन करा. नव्या टॅबवर Facebook.com/15-digit code पेस्ट करुन एंटर बटणवर क्लिक करा. तुमची प्रोफाईल पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल.10 / 10ज्यांनी तुमचं प्रोफाईल चेक केलंय त्या विशेष प्रोफाईलचा स्क्रीनश़ॉट घेऊ शकता. तसेच याबाबत इतरांना देखील याबाबत अलर्ट करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications