एका क्लिकवर जाणून घ्या व्हॉट्सअॅपद्वारे कसे पाठवायचे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 20:48 IST
1 / 9डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार आहे.2 / 9वीचॅट आणि हाईक मेसेजिंग यासारखे अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसला सपोर्ट करतात. परंतू आता व्हॉट्सअॅपने ही सेवा सुरू केली आहे सध्या व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि 20 कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत.3 / 9नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून UPI वापरायची परवानगी व्हॉट्सॲपला देण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम, मोबिक्वीकप्रमाणे UPI द्वारा व्हॉटस्ऍपच्या माध्यमातूनही ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे4 / 9अॅन्ड्रॉइडच्या 2.18.41 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं आहे. तर iOS यूजर्सला पेमेंटचे अपडेट V2.18.21 या व्हर्जनवर उपलबद्ध असेल.5 / 9व्हॉट्सअॅपबाबत वेळोवेळी माहिती लिक करणा-या @WABetaInfo या आयडीवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही युजर्सनं याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 6 / 9 या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यात सेटिंगमध्ये तुम्हाला एक नवीन टॅब मिळेल. 7 / 9ज्यात पेमेंटचा पर्याय देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅंक अकाऊंटचा वापर करुन युपीआयशी जोडू शकता. येथे तुम्हाला नवा ऑथेंटिकेशन पिन मिळेल8 / 9या नंतर तुम्ही यातून बॅंकेचे नाव सिलेक्ट करुन पेमेंट करु शकता. 9 / 9मात्र यासाठी दोन्ही युजर्सकडे हे पेमेंट फिचर असणे आवश्यक आहे.