LIC IPO Top apps to invest IPO including Groww Zerodha Upstox Angel One
LIC IPO: ‘या’ टॉप अॅप्समधून करा सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक; रिवॉर्डही मिळतील By सिद्धेश जाधव | Published: May 04, 2022 4:53 PM1 / 8भारतीय शेयर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. यातील अनेकजण नवखे आहेत आणि कुठून आयपीओसाठी अर्ज करायचं हे माहिती नाही. त्यांच्यासाठी पुढे काही अॅप्सची यादी दिली आहे. 2 / 8हे अॅप्स तुम्हाला फक्त एलआयसी आयपीओनंतर देखील गुंतवणूक करण्यास मदत करतील. काही अॅप्स नवीन अकाऊंटवर रिवॉर्ड देत आहेत. त्यांची माहिती तुम्ही त्या अॅप्सच्या वेबसाईट्सवरून मिळवू शकता. 3 / 8हे अॅप गुगल प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवर देखील उपलब्ध आहेत. याच्या माध्यमातून तुम्ही म्युच्यअल फंड्स, शेयर्स, ETFs, आयपीओ आणि फ्युचर व ऑप्शनमध्ये देखील व्यवहार करू शकता. यातील अनेक फिचर तुम्हाला शेयर मार्केटचं अॅनालिसिस करण्यास मदत करतात. इथे नवीन अकाऊंट ओपन करण्याची प्रोसेस पेपरलेस आहे. 4 / 8ग्रो अॅप प्रमाणे इथे देखील तुम्हाला अकाऊंट ओपन करण्यासाठी पेपरलेस पद्धत मिळते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. गुंतवणुकीवर कोणतीही ब्रोकरेज चार्ज केली नाही तर F&O ट्रेडिंगवर 20 रुपये घेतले जातात. या अॅपचा युआय स्वच्छ आहे. 5 / 8या अॅपमधून तुम्ही शेयर्समध्ये गुंतवणूक तर करू शकता, सोबत आयपीओ, F&O आणि इंट्रा डे ट्रेडिंग देखील करता येते. 70 लाख ग्राहक असल्याचा दावा Angel One नं केला आहे. हे अॅप प्रति ऑर्डर 20 रुपये फ्लॅट ब्रोकरेज इंट्राडे, F&O, करन्सी आणि कमोडिटीसाठी चार्ज करत. 6 / 8LIC IPO मध्ये 24/7 तास आयपीओ अॅप्लिकेशन, WhatsApp द्वारे आयपीओ आणि आयपीओ खुला होण्याआधी अर्ज करण्याचा खास पर्याय देखील मिळेल. या प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही म्युच्यअल फंड्स, शेयर्स, ETFs, आयपीओ आणि फ्युचर व ऑप्शनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करू शकता. 7 / 8हे अॅप गुगल प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. एचडीएफसी सिक्योरिटीज फक्त दोन क्लिक्समध्ये आयपीओला अप्लाय करण्याचा पर्याय देतं. इथे मार्केटच्या लाईव्ह अपडेट दिल्या जातात त्यामुळे घडामोडींची माहिती मिळते. तसेच अनेक पर्यायांचा वापर करून शेयर मार्केटची ओळख देखील करून घेता येते.8 / 8तुम्ही तुमच्या बँकेच्या अॅपवरून देखील आयपीओसाठी अर्ज देऊ शकता. परंतु त्यासाठी तुमचं डिमॅट अकाऊंट असणं आवश्यक आहे. अनेक बँका देखील डिमॅट अकाऊंट ओपन करून देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications