Link mobile number to Aadhar card in just a few minutes See the whole process
अवघ्या काही मिनिटांत करा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक; पाहा संपूर्ण प्रक्रिया By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 1:47 PM1 / 15हल्ली संपूर्ण देशात आधार कार्डाचा वापर करण्यात येतो. सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी ते एक आहे. 2 / 15सरकारनं अनेक ठिकाणी आपलं आधार कार्ड अन्य दस्तऐवजांशीही लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जर तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर सहजरित्या तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. 3 / 15एनरॉलमेंट प्रक्रियेदरम्यान नागरिकांना आधार कार्डाला आपला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागतो. अनेकदा लोकं ते विसरतात किंवा आपला मोबाईल नंबरही बदतात. अशा वेळी त्यांना अनेक ससम्यांचा सामना करावा लागतो. 4 / 15जर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर नसेल तर ते अत्यंत सोप्या पद्धतीनं करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला आधार एनरॉलमेंट / अपडेट सेंटरला जावं लागेल. 5 / 15या प्रक्रियेसाठी ९० दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घेऊया कसा करता येईल मोबाईल नंबर आधारला लिंक.6 / 15सर्वप्रथम तुम्हाला आधार एनरॉलमेंट / अपडेट सेंटरला भेट द्यावी लागेल.7 / 15यानंतर तुम्हाला आधारमध्ये बदल करण्यासाठी असलेला फॉर्म भरावा लागेल.8 / 15जो क्रमांक तुम्हाला आधारशी लिंक करायचा असेल तो फॉर्मवर लिहा आणि त्यानंतर तो फॉर्म त्या ठिकाणी जमा करा.9 / 15त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बायोमॅट्रिक्स करावं लागेल.10 / 15त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याद्वारे तुम्हाला एक रिसिट दिली जाईल.11 / 15त्यावर असलेल्या URN द्वाके तुम्ही तुमच्या अपडेशनचं स्टेटस तपासू शकता.12 / 15मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड बदलण्याची आवश्यकता नाही. 13 / 15ज्यावेळी तुमचा नंबर आधारसोबत लिंक होईल त्यानंतर तुमहाला कोणत्याही आधारसंलग्न कामासाठी ओटीपी मिळण्यास सुरूवात होईल.14 / 15जर तुम्हाला तुमचं अपडेट केल्याचं स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला UIDAI च्या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करू शकता.15 / 151947 हा आधाकचा टोल फ्री क्रमांक आहे. या ठिकाणी आपली भाषा निव़डून ग्राहक सेवा अधिकाऱ्याशी बोलूनही माहिती घेता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications