शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lithium deposits found in J&K: जम्मू काश्मीरमुळे देशाचे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 4:08 PM

1 / 11
स्मार्टफोन असो किंवा इलेक्ट्रीक गाड्या किंवा कोणतेही बॅटरीचे उत्पादन, या सर्वांमध्ये एकच पदार्थ वापरला जातो तो म्हणजे लिथिअम आयन. येत्या काळात जग या लिथिअम आयनसाठी तरसणार आहे. कारण वापर हजारो पटींनी वाढणार असल्याने त्याचा तुटवडा जाणवणार आहे.
2 / 11
असे असताना भारताच्या हाती अब्जावधींच्या लिथिअम आयनचा साठा लागला आहे. येत्या काळात लिथिअम आयनवर उर्जा साठविली जाणार आहे. ईलेक्ट्रीक गाड्यांच्या बॅटरी यावरच अवलंबून असणार आहेत. जगभरातील सर्वच देश पेट्रोलिअम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करत आहेत. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लिथिअम आयन लागणार आहे.
3 / 11
स्वत: भारतालाही लिथिअम आयनची गरज आहे. यासाठी सध्या चीनवर अवलंबून रहावे लागत आहे. भारतामध्ये लिथियम का एक मोठा साठा सापडला आहे. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात हा साठा आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये 5.9 दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला आहे.
4 / 11
हा लिथियम साठा देशात नवी क्रांती घडवून आणेल का? काही बदल होईल का असा प्रश्न असेल तर उद्याची शक्ती ही लिथिअम आयनवरच जोखली जाणार आहे. हाच साठा जगाला भारतासमोर हात पसरायला लावणार आहे.
5 / 11
आज जगभरात हरित ऊर्जेकडे वळण्याची चर्चा सुरु आहे. जगभरातील सरकारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहेत. यामध्ये लिथियमचा मोठा वाटा आहे. लिथियम आयन बॅटरीच्या मदतीने अक्षय ऊर्जा साठवली जाऊ शकते. ही उर्जा नंतर वापरता येते.
6 / 11
या बॅटरी रिचार्ज करता येतात. त्यांचे आयुष्य जास्त असते. यामुळे लिथियम भविष्यात एक आवश्यक धातू बनणार आहे. लिथियम-आयन बॅटरीमध्ये इतर धातू देखील असतात, परंतु यामध्ये मुख्य भूमिका लिथियमची असते.
7 / 11
इलेक्ट्रिक कार असो किंवा मोठा इलेक्ट्रिक ट्रक, या सर्वांमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जाईल. भारतात लिथियमचा साठा उपलब्ध झाल्यामुळे देशात बॅटरी उत्पादनाला चालना मिळणार आहे. जगातील प्रमुख लिथियम उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश होईल.
8 / 11
लिथियमची किंमत सारखी बदलत असते. शेअर मार्केटमध्ये ज्याप्रमाणे कंपनीच्या शेअरचे मूल्य दररोज निश्चित केले जाते, त्याप्रमाणे एक कमोडिटी मार्केट आहे. या बाजारात सध्या लिथिअम आयनची किंमत 472500 युआन (सुमारे 57,36,119 रुपये) प्रति टन होती.
9 / 11
भारतीय रुपयात एक टन लिथियमची किंमत 57.36 लाख रुपये आहे. भारतात ५९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. म्हणजेच या दरानुसार 33,84,31,021 लाख रुपये (3,384 अब्ज रुपये) किंमतीचा हा साठा आहे.
10 / 11
लिथियम उत्पादनात ऑस्ट्रेलिया सध्या एक नंबरला आहे. जगाच्या ५२ टक्के वाटा ऑस्ट्रेलियाचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिली आहे, ज्याचा वाटा 24.5 टक्के आहे. चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, जो 13.2 टक्के लिथियम तयार करतो. भारतासह अन्य देश हे लिथिअम आयात करतात. यापैकी बहुतांशी लिथिअम चीनमार्गेच येते.
11 / 11
2015 च्या तुलनेत 2025 मध्ये लिथिअमची मागणी 1000 टक्क्यांनी वाढू शकते. अशा परिस्थितीत त्याची किंमतही वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात बॅटरीची किंमत कमी होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील कमी होईल. यावरील अवलंबित्व आणि प्रदूषणही कमी होईल.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरSmartphoneस्मार्टफोन