login whatsapp web on desktop without internet in phone new multi device feature has arrived
लय भारी! आता इंटरनेटशिवायदेखील सुरू होईल WhatsApp; जाणून घ्या, नेमकं कसं? By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 11:33 AM1 / 14व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपने आता असंच एक धमाकेदार फीचर आणलं आहे. 2 / 14प्रत्येकजण स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅपचा वापरत असतो. एकाचवेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप वापरता येते. मात्र त्यासाठी स्मार्टफोन ऑनलाईन ठेवण्याची गरज असते. अशावेळी इंटरनेट कनेक्शन बंद झाल्यास सगळीकडे व्हॉट्सअॅप बंद होते. 3 / 14व्हॉट्सअॅपने आता युजर्सना येणाऱ्या या समस्येवर उपाय शोधला असून, एका नवीन फीचरमुळे व्हॉट्सअॅप कोणत्याही डिव्हाइसशी लिंक करण्यासाठी स्मार्टफोन ऑनलाईन ठेवण्याची म्हणजेच इंटरनेटची गरज पडणार नाही.4 / 14अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स आता व्हॉट्सअॅपवर मल्टी-डिव्हाइस फीचर (Multi Device Feature) वापरू शकतील. आतापर्यंत युजर्स त्यांचा स्मार्टफोन डेस्कटॉपशी (Desktop) लिंक करून डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असत. मात्र त्यावेळी त्यांना त्यांचा स्मार्टफोन ऑनलाइन ठेवावा लागत असे. 5 / 14व्हॉट्सअॅप आता आपल्या युजर्सना स्मार्टफोनशिवाय इतर डिव्हाइस ऑनलाईन लिंक करण्याची परवानगी देणारे नवीन फीचर दाखल करणार आहे. सध्या हे फीचर बीटा (Beta) टप्प्यात असून, हे एक ऑप्ट-इन फी चर (Opt-in Feature)आहे. सेटिंग्ज मेनूमधील लिंक्ड डिव्हायसेस ऑप्शनमध्ये ते 'बीटा' या लेबल खाली देण्यात आलं आहे.6 / 14हा ऑप्शन एनेबल केल्यास, तुम्हाला सर्व डिव्हाइसेसवरून अनलिंक केले जाईल आणि तुम्ही नव्याने लिंकिंग केल्यावर, ते पूर्वीप्रमाणे वापरू शकाल. आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनची गरज पडणार नाही. 7 / 14नवीन फीचरमुळे जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप वेब (WhatsApp Web) वापरता तेव्हा तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपजवळ ठेवावा लागणार नाही. तुम्ही मॅन्युअली लॉग आउट न केल्यास, लिंक केलेले डिव्हाइस 14 दिवसांपर्यंत मेसेज मिळवू आणि पाठवू शकेल.8 / 14हे फीचर अँड्रॉईड डिव्हाईसवर योग्य प्रकारे काम करत आहे. तर iOS वर त्याला काही मर्यादा आहेत. अँड्रॉईड डिव्हाईसवर लिंक झाल्यानंतर युजर्स वेब पोर्टलवरून मेसेज आणि थ्रेड्स डिलीट करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 14फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. युजर्सला कमालीचा चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनी आपल्या अॅपमध्ये नेहमीच नवीन अपडेट आणत असते. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. 10 / 14ज्यामधील दोन व्हॉट्सअॅप अॅप आणि एक व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे. व्हॉट्सअॅपने युजर्सना ही मोठी भेट दिली आहे. WhatsApp ने या फीचरच्या रुपाने डेस्कटॉप फोटो एडिटरला आणले आहे. जे एक आवश्यक फीचर्स आहे. हे फीचर्स युजर्सला डेस्कटॉप अॅपच्या मदतीने फोटो सेंड करण्याआधी एडिट करण्याचा ऑप्शन देतो. 11 / 14याआधी हे काम पेंट किंवा अन्य एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. WhatsApp च्या या फीचर्सच्या मदतीने युजर्स स्टिकरला सुद्धा अॅड करू शकता. आतापर्यंत हे फीचर्स फक्त फोनवर उपलब्ध होते.12 / 14कोणीही ऑनलाईन लिंक पाठवून कोणासोबतही चर्चा सुरू करू शकतो. लोक आपल्या मित्रांसोबत ते ऑनलाइन काय करीत आहेत. काय पाहतात, आणि काय ऐकत आहेत याबाबत बोलण्यास नेहमीच उत्सुक असतात. व्हॉट्सअॅपने आपल्या चॅटिंगच्या दरम्यान, लिंक प्रीव्ह्यूच्या ऑप्शनला बदलले आहे. युजर्स आता पूर्ण लिंक प्रीव्ह्यू पाहू शकतात. 13 / 14व्हॉट्सअॅप चॅट दरम्यान स्टिकरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला सामान्य रूपाने योग्य स्टिकर शोधण्यासाठी अनेक टॅब मधून जावे लागते. कधी कधी हे स्टिकर मिळत नाहीत. ज्याला तुम्ही शोधत आहात. आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्सला चॅटिंग दरम्यान, आता स्टिकरचे सजेशन मिळेल. 14 / 14तुम्हाला एकदम योग्य स्टिकर वापर करण्यास मदत मिळेल. हे युजर्सच्या चॅटिंगच्या फ्लोवर परिणाम करू शकत नाहीत. आता नवीन फीचर्स आणल्यानंतर युजर्सला कोणताही त्रास होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी हे फीचर प्रायव्हसीला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहे. त्यांच्या पर्सनल मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनकडून सुरक्षित राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications