शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lok Sabha Election 2019 : मतदार ओळखपत्र तपशील असा करा डाउनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:32 PM

1 / 9
मतदार ओळखपत्र हे अत्यंत महत्त्वाचं असून लोकशाहीत मतदानाचा हक्क प्रदान करण्यासोबतच ते नागरिकत्वाचेही ओळखपत्र आहे. आपण आपल्या मतदार ओळखपत्राचा तपशील ऑनलाईन डाउनलोड करू शकतो. कसं ते जाणून घेऊया.
2 / 9
सर्वप्रथम Electoralsearch.in या वेबसाइटला भेट द्या. येथे तुम्हाला 2 टॅब दिसतील. त्यांपैकी एका टॅबमध्ये तुम्ही तुमचे नाव आणि इतर आवश्यक ती माहिती नमूद केल्यानंतर मतदार ओळखपत्राचा तपशील मिळेल. तर दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राचा EPIC No. अर्थात, मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल.
3 / 9
तुमच्याकडे मतदार ओळखपत्र क्रमांक नसल्यास 'विवरण द्वारा खोज' टॅबवर क्लिक करा.
4 / 9
तुमचे पूर्ण नाव, वडील/पतीचे नाव, लिंग, वय, जन्मतारीख, राज्य आणि जिल्हा, आपला विधानसभा मतदारसंघ याबाबतची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच कोड बॉक्समध्ये दिलेला 5 अंकी कोड अचूकपणे भरा.
5 / 9
तपशील दिल्यानंतर सर्च वर क्लिक करा. त्यानंतर खाली दिसत असलेली माहिती आपल्याला दिसेल.
6 / 9
समोर आलेल्या पर्यायांपैकी ' View Details' वर क्लिक करा. आपल्याबाबतचा सर्व तपशील नव्या टॅबमध्ये उघडेल. खाली दिलेल्या 'मतदाता सूचना प्रिंट करे' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हा तपशील पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल.
7 / 9
तुमच्या कडे तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) असल्यास http://electoralsearch.in ला भेट देत दुसरा टॅब निवडा.
8 / 9
येथे तुम्हाला तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक संख्या, राज्य आणि बॉक्समध्ये दिसणारा Captcha Code टाकावा लागेल ही माहिती भरल्यानंतर सर्च वर क्लिक करा.
9 / 9
यानंतर आपल्या समोर संपूर्ण तपशील येईल. त्या नंतर ' View Details' वर क्लिक करा. तुमचा सर्व तपशील नव्या टॅबमध्ये उघडेल. खाली दिलेल्या 'मतदाता सूचना प्रिंट करें' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हा तपशील पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल. सूचना : या माहितीचा वापर हा मतदार ओळखपत्र म्हणून करता येत नाही.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानtechnologyतंत्रज्ञान