make your whatsapp more safe by these tricks
WhatsApp अकाऊंट असं करा सेफ By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 2:36 PM1 / 6व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपही युजर्सचं चॅटींग गंमतीशीर करण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र अनेकदा व्हॉट्सअॅप अकाऊंट वरून दुसऱ्यांना चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता असते. अशा वेळी आपलं व्हॉट्सअॅप अकाऊंट कसं सेफ ठेवायचं हे जाणून घेऊया. 2 / 6व्हॉट्सअॅपवर दिसणाऱ्या प्रोफाईल फोटोचा अनेकदा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट प्रायव्हसी ऑप्शनमध्ये देण्यात आलेल्या प्रोफाईल फोटो ऑप्शनवर टॅप करा. त्यामध्ये माय कॉन्टॅक्ट्स हा ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे तुमच्या फोनमध्ये सेव्ह असलेल्या कॉन्टॅक्टसना तुमचा प्रोफाईल फोटो दिसेल.3 / 6व्हॉट्सअॅप लॉग इन हे एसएमएस आणि कॉल बेस्ड व्हेरिफिकेशनवर आधारित असतं. हॅकर्स व्हॉईसमेलच्या मदतीने व्हेरिफिकेशन कोड जाणून घेतात. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा त्यामध्ये असलेलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा.4 / 6ऑफिसमध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅप वेबचा वापर केला जातो. मात्र तुमचं व्हॉट्सअॅप वेब संगणकावर सुरू राहीलं तर त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही संगणकावरून बाजूला व्हाल तेव्हा आवर्जून व्हॉट्सअॅप वेब लॉग आऊट करा. 5 / 6व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केलं जाऊ नये यासाठी बायोमॅट्रीक लॉक ऑन करा. आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप सेटींगमधील प्रायव्हसी ऑप्शनवर डाऊन स्क्रिन लॉक ऑन करा. तर अॅड्राँईड युजर्स थर्ड पार्टी अॅपचा वापर करू शकतात. 6 / 6हॅकर्स युजर्सना नकली व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी आकर्षित करत असतात. त्यामुळे फॉरवर्डेड मेसेजवर पटकन विश्वास ठेवू नका. अशा मेसेजची सत्त्यता तपासा आणि त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications