शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकांतातील ते व्हिडीओ, फोटो कसे लीक होतात? हे आहेत 5 प्रकार, पोलिसही सांगणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 5:05 PM

1 / 6
मोहालीमध्ये एका खासगी विद्यापीठाच्या ६० हून अधिक विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचे व्हिडीओ लीक झाल्याने देशभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य तरुणीला व तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. आपणही अनेकदा ऐकतो की या हिरोईनचे खासगी व्हिडीओ लीक झाले, फोटो लीक झाले. हे आयुष्य उध्व्स्त करणारे व्हिडीओ, फोटो लीक कसे होतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल...
2 / 6
अनेकदा तरुणी किंवा तरुण प्रिय व्यक्तीसोबत एकांतात असताना हे व्हिडीओ काढतात, फोटो काढतात. हे फोटो व्हिडीओ एमएमएस लीक होतात, यामागे एक महत्वाचे कारण आहे. या तरुण-तरुणींचा जेव्हा ब्रेकअप होतो, तेव्हाच हे जुने फोटो, व्हिडीओ बहुतांशवेळा लीक होतात. बाकीची कारणे ही तांत्रिक आहेत.
3 / 6
अनेकदा आपण नको नको ते अॅप डाऊनलोड करत असतो. गेम्स असतील, शॉपिंग किंवा लोन अॅप्स. ही अॅप काय करतात तर तुमच्या मोबाईलचा डेटाचा अॅक्सेस मिळवितात. त्याद्वारे तुमचे फोटो, व्हिडीओ चोरतात. ते चोरणारे जे लोक असतात ते असे अश्लील व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर लीक करतात किंवा तुम्हाला लुटण्यासाठी ब्लॅकमेल करतात. यामुळे असे अॅप्स डाऊनलोड करणे टाळा. याचबरोबर असे व्हिडीओ, फोटो काढणेदेखील टाळा. जर तसे काढलेच नाहीत तर लीक होण्याचा प्रश्नच येत नाही.
4 / 6
अनेकदा फोन विकल्यानंतर तरुणींचे फोटो, व्हि़डीओ लीक होतात. कारण जरी तुम्ही डेटा डिलीट केला तरी देखील फोनच्या मेमरीमध्ये डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरद्वारे ते फोटो, व्हिडीओ पुन्हा काढता येतात. यामुळे फोन विकत असताना त्याच्या मेमरीमध्ये फुल होईपर्यंत मुव्हीज किंवा अन्य व्हिडीओ कॉपी पेस्ट करावेत, जेणेकरून मेमरीवर दुसराच डेटा लिहिला जाईल. पूर्ण फुल झाली की ते डिलीट करावेत. म्हणजे तुमचा जुना डेटा चोरांना मिळणार नाही.
5 / 6
दुरुस्तीला देताना देखील अनेकदा तरुणींचे व्हि़डीओ, फोटो लीक झालेले आहेत. दुरुस्त करणारा फोन दुरुस्त झाल्यावर फोटो, व्हिडीओ चाळत असतो, तेव्हा त्याला काहीतरी तसले दिसले की तो ते आपल्याकडे सेव्ह करून ठेवतो. असाच प्रकार फोनमध्ये गाणी किंवा व्हिडीओ भरण्यासाठी दिल्यावरही झालेला आहे. यामुळे या दोन्ही वेळेस सावध असावे. पुन्हा ते आलेच... तसे काही काढलेच नाहीत तर लीक होण्याचा प्रश्नच येत नाही.
6 / 6
लोक फोनचा बॅकअप ऑन ठेवतात. यामुळे, त्यांच्या फाइल्सचा बॅकअप Google ड्राइव्ह किंवा इतर ड्राइव्हवर जातो. थर्ड पार्टी वेबसाइट किंवा अॅपला तुमच्या ड्राइव्हचा अॅक्सेस मिळतो. तेथे अपलोड केलेले व्हिडिओ लीक होऊ शकतात. यासाठी गुगल अॅक्टिव्हिटीवर जा आणि तुम्ही कोणत्याही अज्ञात वेबसाईटला अॅक्सेस दिलाय का ते पहा. असेल तर त्यांना लगेचच ब्लॉक करा.
टॅग्स :relationshipरिलेशनशिप