शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mobile Battery Saver Mode : स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:10 AM

1 / 8
कधी ना कधी ना तुम्ही मोबाईल मध्ये बॅटरी सेव्हर मोडचा वापर केलाच असेल. पॉवर सेव्हिंग मोड, बॅटरी सेव्हिंग मोड, अल्ट्रा पॉवर सेव्हिंग, काही नावं तुम्ही ऐकलीच असतील. आम्ही स्मार्टफोनच्या एका जबरदस्त फीचरबद्दल बोलत आहोत.
2 / 8
आता पॉवर सेव्हिंग मोड  (Power Saving Mode In Smartphone) म्हणजे तुमच्या मोबाईची बॅटरी वाचवणारच. पण खरंच असं होतं का? कदाचित याचं उत्तर हो आहे आणि नाही देखील. याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो, मग तुम्हीच ठरवा हे फीचर चांगलं आहे की वाईट.
3 / 8
बॅटरी सेव्हरचा अर्थ जेव्हा तुमच्या मोबाईलची बॅटरी कमी असेल आणि तुमच्याकडे तो चार्ज करण्यासाठी कोणताही जुगाड नसेल, तेव्हा हे फीचर बॅटरी वाचवण्यासाठी कामी येईल. पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत चुकवावी लागते. जाणून घेऊया हे मोड काम कसं करतं?
4 / 8
त्याच्या नावानुसार, तुम्ही हे फीचर सुरू करताच किंवा बॅटरी कमी झाल्यावर स्क्रीनवर दिसणारा पॉप-अप ओके करताच, बॅकग्राऊंड ॲप्स प्रोसेस बंद होते. ब्ल्युटूथ बंद झालं तर जीपीएसही ऑफ होतं. स्क्रीन रिफ्रेश रेटदेखील कमी होतो. वायब्रेशन एकतर बंद होतं किंवा कमी होते.
5 / 8
ब्राइटनेस कमी किंवा लॉक होऊन जातं. बर्‍याच नोटिफिकेशनपासून ते स्क्रीन अॅनिमेशनपर्यंत, अनेक प्रक्रिया एकतर थांबतात किंवा मर्यादेत चालतात. आता तुम्हाला वाटेल, असं केल्यानं फोनवरील लोड कमी झाला असेल. पण घडतं उलट. फोनचं संपूर्ण मेकॅनिझम बॅटरी वाचवण्यासाठी वापरली जातं.
6 / 8
टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर थ्रॉटलिंग. इतकेच नाही तर बॅटरीला मॉनिटर करणारे अनेक सेन्सरही काम करणं बंद करतात. तुम्हाला वाटत असेल इतकंच? तर जरा थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. एकदा बॅटरी सेव्हर चालू केल्यानंतर, चार्जिंग करताना ते सहसा बंद होत नाही. म्हणजे जेव्हा बॅटरी ८०-९० टक्क्यांपर्यंत पोहोचते तोपर्यंत फक्त पिवळ्या रंगाचा बार दिसतो.
7 / 8
आता विचार करा इतका वेळ बॅटरीचं काय होत असेल? बॅटरी सेव्हरनं तुम्हाला केवळ १० ते १५ टक्क्यांचाच फायदा होते. परंतु अनेक गोष्टींचं नुकसानही होतं. अखेरच एकच बॅटरी सेव्हर या ऑप्शनचा कायमच वापर करू नका. खरंच गरज असेल, तर कधीकधी ते ठीक आहे.
8 / 8
तुम्ही राहिलेल्या बॅटरीत घरी पोहोचू शकता आणि चार्जिंगचा जुगाडही करू शकता, तर अशा परिस्थितीत बॅटरी सेव्हर ऑन करू नका. तांत्रिकदृष्ट्या पाहायचं झालं तर बॅटरी सेव्हर अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये एकसारखंच काम करतं, अशा परिस्थितीत दोघांनीही काळजी घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान