शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल नेटवर्क वारंवार जातंय? घरातील ‘या’ वस्तूमुळे Connectivity मध्ये अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 9:48 PM

1 / 9
मोबाईल नेटवर्क असो इंटरनेट कनेक्शन भारतात नेहमी लोकांना या सुविधेत अडथळा येत असल्याचा सामना करावा लागतो. कॉल ड्रॉप अथवा इंटरनेट नीट चालत नाही. या सर्वांचे कारण म्हणजे नेटवर्क कनेक्टिविटीत समस्या असू शकते.
2 / 9
यूजर्सला कराव्या लागणाऱ्या नेटवर्क कनेक्टिविटीचा सामना केवळ १-२ नेटवर्क ऑपरेटर्सपर्यंत मर्यादित नसतो. तर सर्व टेलीकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्कमध्ये या अडचणी जाणवून येतात. नेमकं यामागे आणखी काही कारण असू शकते का? याबाबत जाणून घ्या.
3 / 9
नेटवर्क कनेक्टिविटीत अडथळा येण्यामागे अन्य कारणंही असू शकतात. ज्यात घरात ठेवलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अथवा तुमच्या स्मार्टफोनची सेटींग. तुम्ही अनेक प्रकारे घरबसल्या तुमच्या मोबाईल नेटवर्कमधील अडथळा दूर करू शकता.
4 / 9
तुमच्या फोनमध्ये इंटरनेटची समस्या असल्यास किंवा तुम्ही फोनवर नीट संवाद साधू शकत नसल्यास, तुम्ही जवळपास ठेवलेल्या कोणत्याही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन उपकरणापासून अंतर ठेवावे किंवा ते बंद करावे. या डिवाइसमध्ये असं उपकरण तुमचे फोन नेटवर्क ब्लॉक करू शकतो.
5 / 9
विशेषत: इंटरनेट राउटर किंवा करंट लॅम्पसारख्या उपकरणांमुळे ही समस्या उद्भवते. तुम्‍ही तुमच्‍या सिम कार्ड दुसर्‍या डिव्‍हाइसमध्‍ये टाकून देखील तपासू शकता की ही समस्या सर्व डिव्‍हाइसवर होतेय किंवा केवळ तुमच्‍या फोनमध्‍ये होत आहे.
6 / 9
काही वेळा सिम सेटिंगमुळेही अशा समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल, तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन ते रीसेट करू शकता. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला मोबाइल नेटवर्कवर जावे लागेल आणि नंतर त्यावर टॅप करावे लागेल. येथून तुम्ही तुमचा ऑपरेटर मॅन्युअल निवडू शकता.
7 / 9
जर तुम्ही iOS वापरकर्ते असाल तर तुम्हाला Settings मध्ये जाऊन Mobile + SIM वर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला सिम सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क सेक्शनमध्ये जावं आणि नंतर नेटवर्क शोधा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑपरेटर मॅन्युअलपणे निवडू शकता. असे करूनही तुमची समस्या दूर होत नाही, तर तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअर सेंटरशी बोला.
8 / 9
दुसरीकडे, जर तुम्ही कोणतीही एक वेबसाइट किंवा अॅप उघडू शकत नसाल, तर ती वेबसाइट किंवा अॅप डाउन असू शकते. सर्व वेबसाइट्स किंवा अॅप्समध्ये समस्या येत असल्यास, तुम्हाला काही गोष्टी तपासाव्या लागतील. तुम्ही तुमच्या फोनचा मोबाइल डेटा चालू/बंद करून तपासू शकता.
9 / 9
याशिवाय, तुम्ही एअरप्लेन मोड चालू आणि बंद करून इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील तपासू शकता. किंवा तुम्ही फोन रीस्टार्ट देखील करू शकता. या मार्गांनी सामान्य नेटवर्क समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. Electromagnets Device: कॉम्प्युटर हार्ड ड्राइव्ह, डोअरबेल, इलेक्ट्रिक मोटर्स, जनरेटर्स, हेडफोन्स, टेलिफोन्स, लाऊडस्पीकर्स, ओव्हन,
टॅग्स :Mobileमोबाइल