शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल फोन हरवलाय...चिंता सोडा; सरकार तुमची मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 1:08 PM

1 / 6
मोबाईल फोन चोरीला किंवा हरवण्याचे प्रकार कधी ना कधी तुमच्यासोबत घडले आहेत. आज मोबाईलमध्ये आपली सर्व माहिती असते. ती देखिल गमवावी लागल्याने होणारे नुकसान वेगळेच. मात्र, आता केंद्र सरकार मदतीला धावले आहे.
2 / 6
दळणवळण मंत्रालय 2017 पासून यावर काम करत आहे. या खात्याने दोन वर्षांत मोबाईलचा आयएमईआय क्रमांकांचे संकलन केले असून मोबाईलच्या 15 आकडी नंबरचा मोठा डेटाबेस बनविला आहे. भारतात सध्या अब्जाच्यावर मोबाईल फोनचा वापर होत आहे.
3 / 6
केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद हे आज एक वेब पोर्टल लाँच करणार असून यावर मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार यावर करता येणार आहे. आज महाराष्ट्रात याचे लाँचिंग आहे. याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
4 / 6
हरवलेल्या मोबाईलचा एफआयआर पोलिसांत दाखल करावा लागणार आहे. यानंतर डॉटच्या 14422 या हेल्पलाईन नंबरवर याची माहिती द्यावी लागणार आहे.
5 / 6
पोलिसांनी तक्रार नोंदविल्यानंतर डॉट हरवलेल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार आहे. यामुळे या मोबाईलचे नेटवर्क बंद होईल. चोरणाऱ्या व्यक्तीला हा मोबाईल निरुपयोगी होणार आहे.
6 / 6
या आयएमईआय क्रमांवरून सेल्युलर ऑपरेटरही नेटवर्क बंद करू शकणार आहे. याबाबतची अधिक माहिती सायंकाळी पोर्टलच्या उद्घाटनानंतरच समोर येईल.
टॅग्स :Mobileमोबाइल