शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अगं बाई अरेच्चा! टॅटू सांगणार 'ब्रेन की बात'; तंत्रज्ञानाचा भन्नाट आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 4:37 PM

1 / 10
आजकाल तरूणाईमध्ये टॅटूची फारच क्रेझ बघायला मिळते. तरूण मंडळी शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू काढतात. सध्या तो ट्रेंडच झाला आहे.
2 / 10
शरीरावर फक्त टॅटू लावून डोक्यात काय चालतंय असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे.
3 / 10
मेंदूचं कार्य कसं सुरू आहे हे समजण्यासाठी डोक्यावर इलेक्ट्रोड लावले जातात. मात्र आता हेच इलेक्ट्रोड्स टॅटूच्या रूपात विकसित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
4 / 10
शास्त्रज्ञांनी टॅटू इलेक्ट्रोड (Tattoo Electrode) विकसित केला असून टॅटू शरीरावर लावून मेंदूत काय चाललं आहे हे समजण्यास मदत होणार आहे.
5 / 10
फ्रान्सेस्को ग्रेसो यांनी इटलीतील शास्त्रज्ञांसह टॅटू इलेक्ट्रोड तयार केला आहे. या टॅटूमध्ये 700 ते 800 नॅनोमीटर्स आहेत जे त्वचेत समान प्रमाणात पसरतात.
6 / 10
EEG इलेक्ट्रोडच्या या टॅटूची चाचणी यशस्वी झाली आहे. आतापर्यंत MEG साठी फक्त वेट इलेक्ट्रोडचा उपयोग होत होता.
7 / 10
टॅटू इलेक्ट्रोडमुळे वेळ आणि पैसा या दोघांची बचत करता येऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे. (फोटो -APA / TU Graz / Greco)
8 / 10
फ्रान्सच्या लॉरा फेरारी यांनी मेंदूतील लहरींची वारंवारता खूप कमी असते. शिवाय EEG तून मिळणारे संकेतही कमी असतात, त्यांना पकडणं EMG आणि ECG संकेतांपेक्षाही कठीण असतं असं म्हटलं आहे.
9 / 10
टॅटू इलेक्ट्रोडमध्ये कंडक्टिव पॉलिमरचा वापर करतात. म्हणजे यामध्ये कोणते धातू नाहीत त्यामुळे MEG चाचणी करताना कोणतीच समस्या येत नाही.
10 / 10
टॅटू लावलेल्या ठिकाणावर केस असले तरीदेखील सिग्नल रेकॉर्ड करण्याच्या प्रक्रियेत काहीच अडचण येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञान