शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Motorola ने स्वस्तातला स्मार्ट टीव्ही लाँच केला; गुगलची थेट मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:11 AM

1 / 6
गुगलने चीनच्या कंपनीला विकलेली मोटोरोला या मोबाईल निर्माता कंपनीने नुकतेच भारतात स्वस्तातील टीव्ही लाँच केले आहेत. मोटोरोलाने 32, 43 फुल एचडी, 43 युएचडी, 50 युएचडी, 55 युएचडी आणि 65 इंचाचे युएचडी टीव्ही लाँच केले आहेत. या स्मार्ट टीव्हीची किंमत 13999 रुपयांपासून सुरू होते. मोटोरोला हे टीव्ही फ्लिपकार्ट आणि अधिकृत वेबसाईटवरून विकणार आहे. येत्या बिग बिलियन डे सेलमध्ये हे टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध होतील.
2 / 6
यावेळी कंपनीने मोटो ई6 या स्वस्तातील मोबाईललाही लाँच केले आहे. यामध्ये 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज, 13+2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
3 / 6
मोटोरोला टीव्ही अँड्रॉईड पाय ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या टीव्हीवर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार सारखे कंटेंट पाहू शकतात. याशिवाय व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅपही डाऊनलोड करता येणार आहेत.
4 / 6
या टीव्हीमध्ये कंपनीने एचडीआर 10 आणि ऑटोट्यून एक्स तंत्रज्ञानाने युक्त डिस्प्ले दिला आहे. याद्वारे चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ पाहता येणार आहे.
5 / 6
याशिवाय कंपनीने टीव्हीमध्ये ट्रू साउंड आणि 30 वॉटचा स्पीकर दिला आहे. डॉल्बी ऑडिओ सिस्टीमही मिळणार आहे. 2.25 जीबी रॅम आणि माली 450 जीपीयू प्रोसेसर देण्यात आला आहे.
6 / 6
टीव्हीमध्ये 16 जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गेम खेळण्यासाठी टीव्ही मध्ये गेमिंग रिमोट कंट्रोल फिचर देण्यात आले आहे.
टॅग्स :Motorolaमोटोरोला