शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New 5G SIM for Reliance Jio, Airtel's 5G network: जिओ, एअरटेलचे 5G नेटवर्क वापरण्यासाठी नवीन 5G सिम घ्यावे लागणार? धडाधड फोन येऊ लागले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:36 PM

1 / 6
रिलायन्स जिओ, एअरटेलने फाईव्ह जी नेटवर्कची घोषणा करताच आता लोकांना ५जी सिमसाठी फोन येऊ लागले आहेत. हे फोन कॉल्स फ्रॉड आहेत. सध्यातरी कोणत्याही कंपनीने ५जी सिमकार्डची घोषणा केलेली नाही. मग अशावेळी रिलायन्स जिओने १५ ऑगस्टपासून 5G सेवा सुरु केली तर त्याचे नेटवर्क कसे मिळणार आदी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
2 / 6
रिलायन्सने जेव्हा ४जी सुरु केलेले तेव्हा नवीन फोरजी सिम आणि मोबाईलपण फोरजी वाला लागत होता. त्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सिम कार्ड मिळविता मिळविता नाकीनऊ येत होते. परंतू, ५जी साठी असे होणार नाहीय. कारण 4G च्या सिमकार्डवरच तुम्हाला 5G नेटवर्क मिळणार आहे. यासाठी तुम्हाला वेगळे ५जी सिमकार्ड लागणार नाहीय. यामुळे अशा फ्रॉड कॉल्सना भुलून तुम्ही फसू नका. तुमचा ओटीपी मागतील आणि तुम्हाला लुबाडतील. सावध रहा.
3 / 6
तुमच्याकडे 5जी मोबाईल असेल आणि जर त्यात 4G LTE वर काम करणारे सिमकार्ड असेल तर तुम्हाला 5G सर्विस वापरण्यासाठी तेच सिमकार्ड वापरावे लागणार आहे. सुरुवातीला कंपन्या वेग वाढवून तुम्हाला 5G सेवा देणार आहेत. तुम्ही तुमच्या सध्याच्या 4G सिम कार्डद्वारे 5G कॉल आणि डेटा वापरू शकणार आहात. मात्र, काही काळानंतर तुम्हाला चांगल्या कव्हरेजसाठी 5G SIM मिळू शकतात. टेलिकॉम कंपन्या फाईव्ह जी नेटवर्क रोलआऊट झाल्यानंतर बाजारात जी सिमकार्ड आणतील त्यावर 5G रेडी किंवा 5G तंत्रज्ञान लिहिलेले असू शकते.
4 / 6
2G युगात, स्मार्ट कार्ड ज्याला आपण सिम (सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल) म्हणतो ते जुन्या मोबाइल कम्युनिकेशन स्टँडर्डवर आधारित होते. पुढे 3G आले आणि ही संज्ञा USIM (युनिव्हर्सल सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल) मध्ये बदलली. ही नवीन स्मार्ट कार्डे 3GPP च्या नवीन मानकांवर आधारित होती. तांत्रिकदृष्ट्या, या नवीन सिम कार्डांना Rel 99+ USIM कार्ड देखील म्हटले जाते आणि ते 2G, 3G, 4G आणि अगदी 5G नेटवर्कसह फॉरवर्ड आणि बॅकवर्डसह.
5 / 6
स्टँडअलोन 5G (SA 5G) सेवांसाठी नवीन सिमकार्ड दिले जाते. परंतू हे नेटवर्क उभारणे एवढे महाग आहे की यासाठी कंपन्यांना दशके लागतील. SA 5G ही एक उच्च-दर्जाचे नेटवर्क आहे, जिथे सर्व नेटवर्क पायाभूत सुविधा 5G आर्किटेक्चरवर तयार केल्या आहेत. हे नेटवर्क जवळजवळ शून्य लेटन्सी, भन्नाट वेग आणि इनडोअर वापरण्यासाठी नेटवर्क कव्हरेज इनडोअर ऑफर करते. महत्वाचे म्हणजे अमेरिकेतही 4G SIM वरच 5G सेवा दिली जात आहेत. जर एखाद्या ग्राहकाला SA 5G वापरायचे असेल तरच त्याला 5G सिम दिले जाते. परंतू, त्याचे कव्हरेज खूप कमी, म्हणजे घर, ऑफिस आदी ठिकाणीच मिळू शकते.
6 / 6
तुम्हाला Airtel, Reliance Jio, Vi, किंवा नवीन कंपनी, म्हणजे अदानी डेटा नेटवर्कसाठी भारतात नव्या 5G सिमची आवश्यकता नाही. तथापि, भविष्यात, या कंपन्यांपैकी एखाद्याने SA 5G सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तुमचे 4G सिम सोडून नवीन 5G सिम घ्यावे लागेल. व्होडाफोनही युरोपमध्ये देखील 4G सिमवरच ५जी सेवा देत आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल