शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Netflix, Amazon Prime मध्ये लागलीय स्पर्धा, आता मिळणार Free Subscription! पण कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 4:29 PM

1 / 6
Netflix, Amazon Prime Free Subscription Offer: हल्लीच्या काळात मनोरंजनाची साधने आणि माध्यमे प्रचंड वाढली आहेत. सुरूवातीला केवळ मोजक्या चॅनेलचा असलेला टीव्ही आता हजारो पर्याय देतो. पण तरीही ज्यांना टीव्हीवरील कार्यक्रम, मालिकांमध्ये रस नसतो त्यांच्यासाठी OTT हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
2 / 6
Netflix आणि Amazon Prime हे सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या बड्या OTT प्लॅटफॉर्मपैकी दोन महत्त्वाचे आणि तितकेच लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहेत. तुम्हालाही हे OTT प्लॅटफॉर्म वारपरायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहोत.
3 / 6
त्याच्या मदतीने तुम्ही Netflix आणि Amazon Prime यासारखे काही प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळवू शकता. तुम्हालाही या ट्रिकबद्दल जाणून घ्यायचे असेल, पाहा त्यासंबंधीचा भन्नाट पर्याय, कारण त्यात तुम्हाला सर्व सुविधा मिळत आहेत.
4 / 6
Airtel 1199 Postpaid Plan- हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. जर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शनबद्दल विचार करत असाल, तर Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन यात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. हा प्लॅन खरेदी करून तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स मिळतात. तसेच दररोज १०० SMS देखील मिळतात.
5 / 6
VI 501 Postpaid Plan- वोडाफोन आयडिया पोस्टपेड प्लॅनच्या यादीत हा प्लॅन खूप चांगला आहे. कारण यामध्ये तुम्हाला Amazon Prime, Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जाते. पण महत्त्वाचे म्हणजे, VI कोणत्याही प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन ऑफर करत नाही. पण यामध्ये तुम्हाला मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. या सोबतच यामध्ये 90GB डेटाही देण्यात आला आहे.
6 / 6
Jio 399 Postpaid Plan- जर तुम्हाला Netflix आणि Amazon Prime चे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत हवे असेल तर जिओचा हा प्लान सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कारण Netflix, Amazon प्राइम सबस्क्रिप्शन फक्त ३९९ रूपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. या सोबतच तुम्हाला 5G डेटा देखील दिला जातो. Amazon Prime Video तुम्हाला एका वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हरची सुविधाही देण्यात आली आहे. सर्व योजनांच्या तुलनेत, जिओ कमी किंमतीत अधिक वैशिष्ट्ये ऑफर करत आहे. यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सamazonअ‍ॅमेझॉनAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)