शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Netflix मध्ये जबरदस्त फीचर; Whatsapp वर शेअर करता येणार चित्रपट, सीरिजमधील फनी क्लिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 10:14 PM

1 / 10
सध्या अनेकांनी आपला मोर्चा OTT प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. लोकप्रिय असलेल्या Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मनं आपल्या युझर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे.
2 / 10
'Fast Laughs' असं या फीचरचं नाव आहे. याद्वारे Netflix वरील निरनिराळ्या सीरिज अथवा चित्रपटांतील मजेशीर क्लिप्स Whatsapp वर शेअर करता येणार आहेत.
3 / 10
चित्रपट आणि वेब सीरिजच्या व्यतिरिक्त स्टँडअप स्पेशल्सच्यदेखील मजेशीर क्लिप पाहू अथवा शेअर करता येणार आहेत.
4 / 10
कंपनीनं भारतात या फीचरची चाचणी सुरू केली आहे. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि युकेच्या युझर्ससाठी हे फीचर उपलब्ध करून देण्यात आलं होतं.
5 / 10
काही युझर्सना हे फीचर दिसण्यास सुरूवात झाली आहे. Netflix अॅपच्या नेव्हिगेशन मेन्यूमध्ये जाऊन हे फीचर अॅक्सेस करता येऊ शकतं.
6 / 10
फास्ट लाफ असलेल्या टॅबवर टॅप केल्यानंतर या क्लिप्स प्ले होण्यास सुरूवात हेईल. एकापोठापाठ एक क्लिप्स यात पाहता येणार आहेत.
7 / 10
युझर्सना या क्लिप्स व्हॉट्सअॅप, शेअरचॅट, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि ट्विटरवरही शेअर करता येणार आहेत.
8 / 10
क्लिप्स पाहतानाच युझरसला फ्ले बटनवर क्लिक करून ती सीरिज अथवा चित्रपट पाहता येईल. जर यातली कोणतीही क्लिप आवडली तर ती तुमच्या लिस्टमध्येही अॅड करता येणार आहे.
9 / 10
'आम्ही नेटफ्लिक्सचा एक्सपिरिअन्स अधिक उत्तम करण्यासाठी नव्या गोष्टींची पडताळणी करकत असतो. आमच्या अनेक युझर्सना कॉमेडी आवडतं आणि यासाठी आम्ही हे फीचर नवे शो किंवा क्लासिक सीन्स शोधण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो,' असं नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
10 / 10
आम्ही निरनिराश्या देशांमध्ये निरनिराळ्या वेळी चाचणी घेत असतो आणि त्यावेळी ते मोठ्या प्रमाणात उपलब्धही करून दिलं जातं. आम्हाला युझरचा एक्सपिरिअन्स अधिक उत्तम करायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सInternetइंटरनेटWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप