Netflix will now automatically download recommended shows movies for you
NETFLIX चं नवं फीचर, आता आपणहून डाऊनलोड होणार तुमच्या आवडत्या मुव्हीज आणि शो By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 9:06 AM1 / 15कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे चित्रपटगृहं असतील किंवा नाट्यगृह सर्वच बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु यावेळी ग्राहकांनी मनोरंजनासाठी ऑनलाईन कंटेन्टचा मार्ग निवडला होता.2 / 15लॉकडाऊनच्या कालावधीत किंबहुना त्यापूर्वीपासूनच ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. 3 / 15नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. दरम्यान, सोमवारी नेटफ्लिक्सनं आपल्या युझर्ससाठी ‘Downloads for You’ हे नवं फीचर आणलंय. 4 / 15‘Downloads for You’ हे फीचर नव्या स्मार्ट डाऊनलोड या फीचरची जागा घेणार आहे. याद्वारे युझर्ससाठी सुचवलेले शो आणि मुव्हीज आपणहून डाऊनलोड होणार आहेत.5 / 15सध्या हे फीचर जगातील सर्व अँड्रॉईड युझर्ससाठी सुरू केलं जाणार आहे. त्यानंत आयओएस युझर्ससाठी हे फीचर सुरू करण्यात येईल. 6 / 15युझर्ससाठी नेटफ्लिक्सकडून सहजरित्या नवा कंटेन्ट शोधं आणि लवकरात लवकर तो पाहणं यासाठी हे फीचर सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. 7 / 15स्मार्ट डाऊनलोड फीचरबाबत सांगायचं झालं तर यात तुमच्याद्वारे पाहिला गेलेला एक एपिसोड डिलीट करून त्यानंतर दुसरा एपिसोड डाऊनलोड केला जातो. 8 / 15याचाच अर्थ यामध्ये मुव्हीज डाऊनलोड करता येत नव्हत्या. परंतु नव्या फीचरमध्ये मुव्हीजही डाऊनलोड होणार आहेत.9 / 15‘Downloads for You’ या नव्या फीचरमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून नवा कंटेन्ट डाऊनलोड करण्यासाठी हे फीचर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये मुव्हीजचा देखील समावेश आहे.10 / 15नेटफ्लिक्सनं दिलेल्या माहितीनुसार यामध्ये युझर्सच्या आवडीनुसारचा कंटेन्ट आपल्या आपण डाऊनलोड होणार आहे.11 / 15‘Downloads for You’ या फीचरच्या मदतीनं युझर्सना आपल्या प्राथमिकतेनुसार डेटा लिमिट निवडता येणार आहे. फीचर अनेबल केल्यानंतर १ जीबी, २ जीबी ते ५ जीबीपर्यंत डेटा डाऊनलोडचा ऑप्शन असेल.12 / 15डाऊनलोड झालेला कंटेन्ट पाहण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. इंटरनेटशिवायदेखील हा कंटेन्ट पाहता येणार आहे. ही दोन स्टेप प्रक्रिया असल्याचंही नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे. 13 / 15सर्वप्रथम युझरला डाऊनलोड टॅबमध्ये जावं लागणार असून ‘Downloads for You’ यावर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला कंटेन्टची अमाऊंट सिलेक्ट करावी लागले. 14 / 15म्हणजेच तुम्ही १ जीबी,२जीबी आणि ५ जीबी पैकी किती कंटेन्ट डाऊनलोड करू इच्छिता हे टाकावं लागेल. त्यानंतर टर्न ऑन वर क्लिक करावं लागेल.15 / 15लवकरच iOS वर हे फीचर टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती नेटफ्लिक्सनं दिली. तसंच परंतु हे कधी सुरू होईल याबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications