New feature of WhatsApp, now one account will work in two phones
भारीच! WhatsApp च नवं फिचर, आता दोन फोनमध्ये एकच अकाऊंट चालणार By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 9:23 AM1 / 8WhatsApp सध्याच्या काळात गरजेच माध्यम बनलं आहे. हे मेसेंजिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. WhatsApp दरवेळी नव नवे बदल करत असत. आता अॅप मल्टी डिव्हाइसवर काम करत आहे. यामुळे आता एकच अकाउंट दोन मोबाईलवर चालणार आहे. 2 / 8अनेक दिवसांपासून यूजर्स या फीचरची मागणी करत होते. आता एकच अकाउंट दोन फोनमध्ये वापरण्यासाठी तिसऱ्या अॅपची गरज नाही.3 / 8टेलीग्राम याआधीच आपल्या युजर्सना अशीच सुविधा देत आहे. आता हे फीचर WhatsAppवरही लवकरच उपलब्ध होऊ शकते. 4 / 8हे फिचर सध्या बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. काही वापरकर्त्यांसाठी Companion Mode फिचर दिले आहे. यात, ते नवीन फोनमध्ये सेकंडरी डिव्हाईस म्हणून वापरु शकतात.5 / 8WABetainfo ने यासंदर्भात एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यासाठी नवा पर्याय दिला आहे. टॅबलेट सपोर्टच्या लिंकसोबतच बीटा यूजर्सना फोन सपोर्टही मिळत आहे. यासाठी लिंक केलेल्या उपकरणाच्या पर्यायामध्ये Link with your phone हा पर्याय उपलब्ध असेल.6 / 8WABetainfo ने यासंदर्भात एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यासाठी नवा पर्याय दिला आहे. टॅबलेट सपोर्टच्या लिंकसोबतच बीटा यूजर्सना फोन सपोर्टही मिळत आहे. यासाठी लिंक केलेल्या उपकरणाच्या पर्यायामध्ये Link with your phone हा पर्याय उपलब्ध असेल.7 / 8यानंतर अॅपमध्ये QR कोड स्कॅन करावा लागणार आहे. सध्या तुम्ही WhatsApp डेस्कटॉपवर वेबच्या माध्यमातून वापरता हे तसेच आहे. फोनमध्ये अकाउंट लिंक करताच तुम्हाला दोन्ही फोनवरुन चॅट करता येणार आहे. 8 / 8यात लाइव्ह लोकेशन, स्टिकर्स आणि ब्रॉडकास्ट सारखे फिचर सिंक होणार नाहीत. एका WhatsApp खात्यातून तुम्ही चार उपकरणे जोडू शकता. त्याच WhatsApp खात्याशी आणखी दोन फोन जोडले जाऊ शकतात. हे फिचर सध्या बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनी लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीझ करू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications