शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमधून घुसतोय malware व्हायरस...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 10:30 PM

1 / 10
नवी दिल्ली : आपल्या नव्या पॉलिसीमुळे व्हॉट्सअ‍ॅप आधीच वादात सापडले आहे. यातच आता व्हॉट्सअ‍ॅपवरील एका धक्कादायक मेसेजबाबत माहिती समोर येत आहे. हा मेसेज अँड्राईड युजर्संना टारगेट करत आहे.
2 / 10
या मेसेजमधून Worm नावाचा व्हायरस तुमच्या फोनमध्ये शिरकाव करत आहे. हा मेसेज चुकून जर तुम्ही कुठल्या ग्रूप किंवा मित्र-मैत्रीणींना पाठवला तर त्याच्याही फोनला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
3 / 10
जर हा मालवेयर तुमच्या फोनमध्ये आला असेल तर जे लोक तुम्हाला मेसेज करतील, त्यांना देखील आपोआप मेसेज रिप्लाय स्वरुपात जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटोरिप्लाय केला जाईल.
4 / 10
एका सिक्युरिटी रिसर्चने व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. सिक्यॉरिटी फर्म ESET च्या सिक्यॉरिटी रिसर्च Lukas Stefanko यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर मालवेअर व्हायरस असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आले तर त्यांना आपोआप रिप्लाय दिले जात आहेत. हे त्या व्हायरसमुळे होत आहे.
5 / 10
मेसेजमध्ये गुगल प्ले पेजची एक फेक लिंक दिली जाते. त्यावरून एक अॅप डाऊनलोड करायला सांगितले जाते. एका तासात एका युझरला एक लिंक पाठवली जाते.
6 / 10
लोकांना फसवून पैसे कमवण्याच्या हेतूने हे अॅप डिझाइन करण्यात आले आहे. त्यातून व्हायरस लोकांच्या फोनमध्ये सोडला जात आहे. तर एका युझरनं दिलेल्या माहितीनुसार डुप्लिकेट अॅप किंवा फेक अॅप पेज करून देखील असे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
7 / 10
दरम्यान, तुमच्या फोनमध्ये अनोळखी अॅप्स म्हणजेच Unknown Appsची परवानगी देऊ नका. त्यामुळे Unknown Apps डाऊनलोड करताना फोन दरवेळी परवानगी मागेल.
8 / 10
त्यामुळे आपल्या फोनमध्ये व्हायरस येण्यापासूनचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्या फोनमध्ये एक बदल अजूनही केला नसेल तर लगेच करा.
9 / 10
फोनच्या सेटिंगमध्ये जा Settings तिथून Apps पर्याय निवडा आणि Special Access वर क्लिक द्या. त्यानंतर Install Unknown Apps हा पर्याय असेल. तिथे आपण परवागी न देण्यावर क्लिक करा. त्यामुळे अनोळखी अॅपला आपल्या फोनमध्ये प्रवेश मिळणार नाही.
10 / 10
तसेच, तुम्ही सिक्युरिटी ऑपशनमध्ये जाऊन Unknown Sources पर्याय बंद करून टाका. याशिवाय एखाद्या अॅन्टीव्हायरस अॅपचा वापर करून आपण या व्हायरसला आपल्या फोनमध्ये येण्यापासून रोखू शकता.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान