New Year gift from WhatsApp; The app can be used even after the internet is off, this is the process
व्हॉट्सअपकडून नववर्षाची भेट; इंटरनेट नसल्यावरही वापरता येईल ॲप, 'ही' आहे प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 2:51 PM1 / 8व्हॉट्सअपकडून युजर्संना आकर्षित करण्यासाठी आणि चांगल्या सुविधेसाठी नवनवीन फिचर्स देण्यात येते. आता कंपनीकडून आणखी एक पाऊल पुढे जात असल्याचं दिसून येत आहे. 2 / 8व्हॉट्सअपचे लेटेस्ट फिचर याचा पुरावा आहे. व्हॉट्सअपने जगभरातील युजर्संसाठी proxy support लाँच केले आहे. कंपनीने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. 3 / 8प्रॉक्सी सपोर्टच्या सहाय्याने विना इंटरनेट तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येणार आहे. ज्या एरियात इंटरनेटत नाही, तेथेही युजर्संना व्हॉट्सअप वापरता येईल. 4 / 8या नवीन फिचर्संच्या सहाय्याने व्हॉट्सअप युजर्सं जगभरात स्वयंसेवक आणि संस्थेच्या प्रॉक्सी सर्वर सेटअपच्या माध्यमातून कनेक्ट राहू शकणार आहेत. त्यासाठी, काय करावं हेही जाणून घेऊ. 5 / 8प्रॉक्सी नेटवर्कद्वारे व्हॉट्सअपने कनेक्ट झाल्यासही प्रायव्हसी आणि सिक्युरिटीची चिंता करायची गरज नाही. कारण, पूर्वीसारखीच प्रायव्हसी आणि सिक्युरिटी उपलब्ध असणार आहे.6 / 8वर्ष २०२३ साठी आमच्या शुभेच्छा, कधीही इंटरनेट शटडाऊन होऊ नये. पण, आपत्कानील स्थितीत तसं झाल्यास, प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने तुम्ही कनेक्ट राहा, असे व्हॉट्सअपने म्हटले आहे. 7 / 8व्हॉट्सअपच्या सेटींगमध्ये मेन्यूमध्ये हा नवीन ऑप्शन मिळेल. WhatsApp Setting मध्ये Storage and Data चे ऑप्शन मिळेल. तेथे Proxy च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार. त्यानंतर, Use proxy या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर, Proxy Address एंटर करुन सेव्ह करावे. 8 / 8याप्रकारे आपण या नवीन फिचर्सचा वापर करू शकता. जर कनेक्शन सक्सेस झाले तर, आपणास चेकमार्क दिसून येईल. मात्र, कनेक्ट होऊनही तुम्हाला व्हॉट्सअपवर मसेज पाठवता येत नसेल तर तुम्हाला ब्लॉक करण्यात आलं आहे, असे समजून घ्यावे. आणखी वाचा Subscribe to Notifications