'या' आहेत जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 11:55 IST
1 / 8सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा वापर कोट्यवधी युजर्स करत आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट्सबाबत जाणून घेऊया. 2 / 8सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट म्हणून फेसबुक सर्वांनाच माहीत आहे. फेसबुकचे 238 कोटी मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. 3 / 8मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा वापर हा प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी ट्विट करण्यासाठी केला जातो. ट्विटरचे 32.1 कोटी मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहे. 2006 मध्ये सुरू झालेल्या ट्विटरवर महत्त्वाच्या व्यक्तींना फॉलो करता येतं. 4 / 8सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टाग्रामचे 100 कोटी मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. 5 / 82011 मध्ये सुरू झालेली स्नॅपचॅट सर्व्हिसचे 33 कोटी पेक्षा अधिक मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तरुणाईमध्ये हे लोकप्रिय अॅप आहे. 6 / 8प्रोफेशनल लोकांसोबत कनेक्ट होण्यासोबतच नवीन जॉब्स ओपनिंगपर्यंत युजर्सना जॉईन करणं हा लिंक्डइनचा उद्देश आहे. लिंक्डइनचे 30.3 कोटी मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. 7 / 82010 मध्ये पिनट्रेस्टची सुरुवात झाली असून त्यावर वेगवेगळ्या विषयांशी संबंधित पिन्स आणि व्हिज्युअल्स युजर्सना मिळतात. यावरील फॅशन, फूड, डेकोरोशन आणि वर्कआऊटसारखे विषय लोकप्रिय आहेत. 8 / 82005 मध्ये सुरू झालेलं रेडिट सर्वात जास्त व्हिजिट केल्या जाणाऱ्या टॉप 20 साईट्समधील एक आहे. यावर 150,000 हून अधिक कम्युनिटीज आणि 33 कोटी मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत.