note down these 5 things before giving mobile to service center
मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये देताना 'या' चुका नक्की टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:46 PM1 / 6मोबाईल हा आता प्रत्येकाच्याच जगण्याचा एक भाग झाला आहे. त्यामुळेच मोबाईलमध्ये बिघाड झाल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याशिवाय पर्यायच नसतो. मात्र घाईघाईत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देताना काही चुका होतात. त्यामुळे फोन देण्याआधी कोणती काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया. 2 / 6मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये देण्याआधी फोनमधील सर्व फोटो, नंबर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा बॅकअप घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा फोन दुरुस्त करताना मोबाईलमधील डेटा डिलीट होण्याची शक्यता असल्याने ही काळजी नक्की घ्या.3 / 6 मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये देण्याआधी सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून तुमच्या जवळ ठेवा. कार्डच्या माध्यमातून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सिम कार्ड आणि मेमरी कार्ड सांभाळून ठेवा. 4 / 6मोबाईलमध्ये काही बिघाड झाल्यास एखाद्या लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये फोन न देता योग्य अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच तो दुरुस्त करायला द्या. 5 / 6सर्व्हिस सेंटरमध्ये फोन दुरुस्त केल्यानंतर त्याचे अधिकृत बील घ्यायला विसरू नका. तसेच मोबाईल खराब होण्यामागील कारणाची चौकशी करा. 6 / 6मोबाईल थोडा जून झाल्यास त्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. त्यावेळी काय काय समस्या आहेत त्याची एक यादी करा. म्हणजे सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल देताना त्या गोष्टी तुमच्या नीट लक्षात राहतील. आणखी वाचा Subscribe to Notifications