now get all infornation about corona vaccination centre on whatsapp
Corona Vaccination: मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 4:50 PM1 / 10गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. 2 / 10ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांची कमतरता जाणवत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 / 10देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा पार पडत असून, १८ वर्षांवरील पात्र सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, अनेकदा आपल्याला कोरोना लसीकरण केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळत नाही. (corona vaccination centre on whatsapp)4 / 10आता मात्र कोरोना लस मिळवायची असेल आणि कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर उपयोगी ठरू शकते. कारण यासंदर्भातील माहिती आता WhatsApp वर मिळणार आहे. 5 / 10MyGovIndia ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क आता लोकांना जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल माहिती देणार असून, हेल्पडेस्क हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये माहिती उपलब्ध असेल.6 / 10सर्व प्रथम, तुम्हाला फोनमध्ये 9013151515 नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर फोनमध्ये WhatsApp उघडावे. 7 / 10WhatsApp उघडल्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरसह चॅट बॉक्स ओपन करावे. यानंतर 'नमस्ते' असे टाइप करून पाठवावे. यानंतर आपल्याला ९ पर्यायांसह प्रत्युत्तर येईल.8 / 10लसीकरणाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला १ लिहून पाठवावे लागेल. यानंतर तुम्हाला २ पर्याय मिळतील, त्यातील केंद्राच्या माहितीसाठी पहिला पर्याय पाठवावा लागेल.9 / 10यानंतर तुम्हाला पिन कोड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. आपल्या क्षेत्राचा पिन कोड लिहा आणि पाठविताच आपल्याला पिन कोड जवळील लसीकरण केंद्राची माहिती मिळेल.10 / 10यानंतर तुम्हाला पिन कोड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. आपल्या क्षेत्राचा पिन कोड लिहा आणि पाठविताच आपल्याला पिन कोड जवळील लसीकरण केंद्राची माहिती मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications