now whatsapp web account will not open without pin strong security feature will come soon
मस्तच! आता WhatsApp होणार अधिक सुरक्षित; 6 डिजिट पिनशिवाय लॉगइन करू शकणार नाही युजर्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:32 AM1 / 7व्हॉट्सअॅपमध्ये कंपनी अनेक नवनवीन अपडेट देत असते. आता WhatsApp अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी आणखी एक फीचर जोडण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये आता टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 2 / 7डेस्कटॉप युजर्ससाठी फक्त हे फीचर असेल. तसेच हे फीचर वापरायचं की नाही यासाठीचीही सुविधा युजर्सला मिळणार आहे. सध्या ज्यावेळी तुम्ही नव्या स्मार्टफोनद्वारे WhatsApp वर लॉगइन करता, त्यावेळी अॅप एक 6 डिजिट कोड मागतो. 3 / 7हा कोड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जातो. डेस्कटॉप लॉगइनसाठी तुम्हाला केवळ व्हॉट्सअॅप वेबवर (WhatsApp Web) एक क्यूआर कोड स्कॅन (QR Code) करावा लागतो. त्यानंतर तुमचं अकाउंट लॉगइन केलं जातं. 4 / 7यासाठी तुम्हाला कोणत्याही पीनची (PIN) गरज पडत नाही. परंतु आता व्हॉट्सअॅप वेबसाठी पीनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 6 डिजिट PIN ने लॉगइन करावं लागेल. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. 5 / 7WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चॅटचा (WhatsApp Chat) अॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. व्हॉट्सअॅप प्रत्येक ठिकाणी टू-स्टेप वेरिफिकेशन मॅनेज करणं अधिक सोपं करण्याच्या प्रयत्नात आहे. 6 / 7येणाऱ्या अपडेटमध्ये वेब/डेस्कटॉपवर ही फीचर सुरू करण्यासाठी काम सुरू आहे. PIN 6 डिजिटचा असेल. सध्या हे फीचर टेस्टिंग स्टेजमध्ये आहे. लवकरच हे फीचर रिलीज केलं जाईल अशी माहिती मिळत आहे.7 / 7मिळालेल्या रिपोर्टनुसार, वेब/डेस्कटॉप युजर्स टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल किंवा डिसेबल करू शकतील. हे अशावेळी अधिक गरजेचं ठरतं, ज्यावेळी तुमचा फोन हरवतो आणि तुमचा पीन तुमच्या लक्षात नसतो. तुम्ही एका रिसेट लिंकद्वारे पीन रिस्टोर करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications