शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 14:34 IST

1 / 10
ऑनलाइन कॅब सेवा देणारी कंपनी ओलाने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. ऑनलाइन टॅक्सी कंपनी ओला आता नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपची मदत घेणार नाही. कंपनीने स्वत:च्या विकसित मॅप प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली आहे.
2 / 10
ओला कॅबने स्वतःचा नकाशा लाँच केला असून त्याला ओला मॅप्स (Ola Maps) असे नाव देण्यात आले आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
3 / 10
भाविश अग्रवाल म्हणाले, 'आम्ही Google Maps साठी दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च करत होतो. मात्र, आता आम्ही आमच्या स्वतःच्या Ola Maps वर स्विच केले आहे. त्यामुळे यासाठी येणारा हा सर्व खर्च पूर्णपणे वाचवला आहे'
4 / 10
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच ओलाने मायक्रोसॉफ्ट ॲझ्युरकडून क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर बदलले होते. आता कंपनी स्वतःची इकोसिस्टम चालवेल आणि तिचे त्यावर लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) आर्टिफिशियल इंटेलिजन्सही चालणार आहे.
5 / 10
भाविश अग्रवाल यांनी असेही सांगितले की, आगामी काळात ओला मॅप्समध्ये आणखी बरीच नवीन फीचर्स जोडली जातील. जसे की स्टीट व्ह्यू, 3 डी मॅप्स, न्यूरल रेडियंस फील्ड्स (NERFs), इनडोअर इमेजिस, ड्रोन मॅप्स इत्यादी.
6 / 10
Ola Maps तयार करण्यासाठी OpenStreetMap नावाचा ओपन-सोर्स प्रकल्प देखील वापरला गेला आहे. OpenStreetMap सोबत ओला कंपनीने स्वतःचा डेटा देखील वापरला आहे.
7 / 10
दरम्यान, सामान्य लोक Google Maps मोफत वापरू शकतात. पण ओला सारख्या कंपन्या गुगल मॅप्सचे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) वापरतात, ज्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात.
8 / 10
ओला कंपनीला आशा आहे की, स्वत:चा Ola Maps वापरून ते आपला खर्च वाचवतील. मात्र, ओलाला स्वतःचा मॅप चालवण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील.
9 / 10
Ola Maps केवळ ओलाच्या राइड-हेलिंग सर्व्हिस आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठीच नसेल. तर डेव्हलपर्स देखील ओला मॅप्सचे API वापरण्यास सक्षम असतील.
10 / 10
म्हणजेच इतर ॲप बनवणाऱ्या कंपन्याही त्यांच्या ॲप्समध्ये ओला मॅप्स वापरू शकतील. मात्र यासाठी डेव्हलपर्सना ओलाला पैसे द्यावे लागतील. हे पेमेंट ओलाच्या कृत्रिम क्लाउड सिस्टमद्वारे केले जाईल.
टॅग्स :Olaओलाcarकारtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय