Old Coins And Notes In India How To Sell
जुन्या नोटा आणि नाणी करू शकतात तुम्हाला मालामाल; ‘या’ 5 वेबसाईट करतील मदत By सिद्धेश जाधव | Published: February 12, 2022 6:26 PM1 / 8जुन्या नोटा-नाणी विकून चांगली कमाई केली जाऊ शकते. काही 25 आणि 50 पैशांची नाणी गेल्यावर्षी दीड लाखांमध्ये विकली जात होती. काही संग्रह करणारे लोक हजारो किंवा कधी कधी लाखो रुपये मोजण्यासाठी तयार असतात. फक्त या नोटा-नाण्यांना योग्य मंच मिळायला हवा. 2 / 8पुढे आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सची यादी दिली आहे जिथे तुम्ही जुन्या नोटा किंवा नाणी विकू शकता. इथे असलेल्या अन्य लिस्टिंग बघून तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या चलनांची किंमत ठरवण्यास देखील मदत होईल. 3 / 8Coinbazaar वर फक्त पुरातन मेडल्स, चलन आणि नोटा व नाणी यांची खरेदी-विक्री होते. या वेबसाईटवर तुम्ही स्टोर मॅनेजरवर क्लीक करून ई-मेल आयडी देऊन रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या जुन्या नाण्यांचे किंवा नोटांचे फोटो, डिटेल्स आणि किंमत देऊन विक्री सुरु करू शकता. 4 / 8OLX सेकन्ड हॅन्ड वस्तू विकण्यासाठी प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे. अनेकजण याचा वापर जुनी नाणी आणि नोटा विकण्यासाठी करत आहेत. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा गुगल अकॉउंटसह रजिस्टर करू शकता. जेव्हा कोणाला तुम्ही केलेली लिस्टिंग आवडेल तेव्हा तुम्हाला ओएलएक्सच्या माध्यमातून संपर्क करतील. 5 / 8OLX प्रमाणे Quickr वर देखील अन्य वापरलेल्या वस्तूंसह जुन्या नोटांची आणि नाण्यांची विक्री केली जाते. इथे तुम्ही हाय क्वॉलिटी इमेजसह तुम्हाला हवी ती किंमत लिस्ट करू शकता. 6 / 8eBay देखील जुन्या वस्तूंची मार्केट प्लेस आहे. इथे तुम्ही तुमचं अकॉउंट शेलार म्हणून ओपन करू शकता. हा प्लॅटफॉर्म तुमची लिस्टिंग अन्य eBay युजर्सना दाखवतो, जे खरेदी करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतात. 7 / 8Indiamart देखील जुना चलनांना चांगली किंमत मिळवून देऊ शकते. या वेबसाईटवर तुम्ही तुमची लिस्टिंग करू शकता. 8 / 8तुमच्या आजूबाजूला देखील जुन्या नोटा किंवा नाण्यांची खरेदी करणारे ट्रेडर्स असू शकतात. यासाठी तुम्हाला गुगलकडून मदत मिळू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications