शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो...तासाला 225 कोटी रुपयांपर्यंत कमवितात या जगविख्यात कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 3:46 PM

1 / 6
जगात वर्षाला हजारो कोटींची कमाई करणाऱ्या कंपन्या आहेत. पण अशा काही कंपन्या आहेत ज्या तासालाच 225 कोटी रुपयांपर्यंत पैसे कमवितात. मग दिवसाला त्यांच्या कमाईचा विचारच न केलेला बरा. यामध्ये पहिल्या पाच कंपन्या कोणत्या? चला पाहुयात.
2 / 6
दर तासाला सर्वाधिक कमाई असलेल्या पाच कंपन्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर इंटेल या प्रोसेसर बनविणाऱ्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी तासाला 61.77 कोटी रुपये कमविते.
3 / 6
तर मायक्रोसॉफ्ट य़ा कंपनीचे नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ही कंपनी तासाला 160.5 कोटी रुपये एवढी कमाई करते.
4 / 6
जगाचे सर्चइंजिन बनलेल्या गुगलचे नाव यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुगल तासाला 130 कोटीं रुपयांची कमाई करते. गुगलचा पसारा मोठा असला तरीही कंपनीला त्यामानाने उत्पन्न मिळत नाही.
5 / 6
या यादीमध्ये अॅपल ही मोबाईल आणि कॉम्प्युटर निर्माता कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. अॅपला तासाला 205 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करते.
6 / 6
तर पहिल्या क्रमांकावर नावाप्रमाणेच विशाल असलेल्या अॅमेझॉन कंपनीने नाव नोंदविलेले आहे. जगातील सर्वात जास्त उत्पन्न याच कंपनीचे आहे. तब्बल 225 कोटी रुपये ही कंपनी कमविते. या कंपनीचे मालक जेफ बेजोस हे देखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
टॅग्स :googleगुगलamazonअ‍ॅमेझॉन