लॉकडाऊनमध्ये OnePlus 8, 8 Pro भारतात लाँच; जाणून घ्या किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 8:44 AM
1 / 11 चीनची प्रिमिअम स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने OnePlus 8 सिरिज भारतात ऑनलाईन लाँच केली आहे. मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन स्मार्टफोन 5G नेटवर्क सपोर्ट आणि पंच-होल डिस्प्ले पॅनेलसह बाजारात आणले आहेत. मात्र, कंपनीने OnePlus 8 Lite या कमी किंमतीच्या फोनला लाँच केलेले नाही. 2 / 11 OnePlus 8 तीन रंगांमध्ये येईल. Onyx Black, Glacial Green आणि Interstellar Glow असे हे रंग आहेत. 6.55 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. 3 / 11 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर आणि X55 5G चिपसेट देण्यात आला आहे. यावर Android 10 वर आधारित OxygenOS काम करते. 4 / 11 याशिवाय पुढे 16MP चा कॅमेरा ऑटो-फोकस आणि टाइम लॅप्स सारख्या फिचरनी युक्त आहे. 5 / 11 ४३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय WarpCharge 30T फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. USB Type C, NFC, WiFi 6 कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे. 6 / 11 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48MP चा प्राइमरी रियर सेन्सर, 16MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP चा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. 7 / 11 OnePlus 8 Pro मध्ये काही महत्वाचे बदल 8 / 11 OnePlus 8 Pro मध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याला IP68 वॉटर आणि डस्ट प्रुफ रेटिंग देण्यात आलेले आहे. 9 / 11 या फोनमध्ये पाठीमागे चार कॅमेरे देण्यात आले आहेत. 48MP चा प्राइमरी रियर सेन्सर, 8MP टेलिफोटो सेन्सर, 48MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 5MP का कलर फिल्टर कॅमेरा देण्यात आला आहे. 10 / 11 पुढे 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4,510mAh ची बॅटरीही देण्यात आली आहे. 11 / 11 दोन्ही फोनची डिझाईन एकसारखीच असून पंच होल Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus 8 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 60,000 रुपये आहे. तर OnePlus 8 Pro च्या 8GB RAM + 128GB ची किंमत 68,200 रुपये असेल. 12GB RAM + 256GB ची किंमत 75,800 रुपयांच्या आसपास असणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या किंमती डॉलरमधून रुपयांमध्ये दिलेल्या आहेत. भारतीय बाजारातील किंमतींची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. यापेक्षा कमी किंमतीत ते उपलब्ध होऊ शकतात. आणखी वाचा