By सिद्धेश जाधव | Updated: December 17, 2021 17:53 IST
1 / 12OnePlus Community Sale आज शुक्रवार 17 डिसेंबरपासून सुरु झाला आहे. कंपनीच्या 8 व्या वर्धापन दिनाच्या या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि ऑडिओ अॅक्सेसरीज स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळेल. हा सेल 20 डिसेंबरपर्यंत सुरु असेल.2 / 12फ्लॅगशिप OnePlus 9 Pro स्मार्टफोन सेलमध्ये 54,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याची मूळ किंमत 64,999 रुपये आहे. यासाठी ICICI Bank किंवा Kotak Mahindra Bank क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरील 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट व 6,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल. 3 / 1249,999 रुपयांमध्ये आलेला OnePlus 9 स्मार्टफोन सेल अंतगर्त 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे स्मार्टफोन खरेदी केल्यास 2,799 रुपयांचा OnePlus Band फिटनेस ट्रॅकर 999 रुपयांमध्ये तर 899 रुपयांचे OnePlus Gaming Triggers 499 रुपयांमध्ये पण विकत घेता येतील. 4 / 12OnePlus 9R स्मार्टफोनवर ICICI Bank किंवा Kotak Mahindra Bank क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर करून 3,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट आणि 4,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. त्यामुळे 39,999 रुपयांचा हा फोन 33,999 रुपयांमध्ये घरी आणता येईल. 5 / 12OnePlus 8T स्मार्टफोन 38,999 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 42,999 रुपये आहे. यासाठी बँक ऑफर्स किंवा एक्सचेंज बोनसची आवश्यक नाही. 6 / 12OnePlus Nord 2 PAC-MAN Edition स्मार्टफोन 37,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता. परंतु सेलमध्ये ICICI किंवा Kotak Mahindra Bank क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर करून हा फोन फक्त 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. 7 / 12OnePlus Nord 2 स्मार्टफोन बँक ऑफर्समुळे 29,999 रुपयांच्या ऐवजी 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जुना फोन देऊन आणखीन 3,000 रुपये वाचवता येतील. 8 / 12OnePlus Nord CE 5G वर देखील 1,500 रुपयांचा बँक डिस्काउंट देईल जात आहे. तसेच एक्सचेंज बोनसमुळे 3,000 रुपये कमी द्यावे लागतील. सेलमध्ये 24,999 रुपयांचा फोन 20,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 9 / 12OnePlus TV Y सीरीजची किंमत 18,999 रुपयांवरून 16,999 रुपये झाली आहे. 50 इंचाचा OnePlus TV U1S मॉडेल 46,999 रुपयांच्या ऐवजी 38,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus TV Q1 Pro वर देखील 4,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक डेबिट व क्रेडिट कार्ड धारकांना 5,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. 10 / 12OnePlus Watch वर 11 टक्के डिस्काउंट आहे. OnePlus Watch Harry Potter Limited Edition वर 4,000 रुपयांची सूट मिळते. OnePlus Band 2,799 च्या ऐवजी 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर OnePlus Band Steve Harrington Edition ची किंमत 300 रुपयांनी कमी झाली आहे. 11 / 12OnePlus Buds Pro सेलमध्ये 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल, तसेच बँक ऑफर अंतर्गत 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. OnePlus Buds Z वर 5 टक्क्यांचा डिस्काउंट आहे. टाइप-सी बुलेट ईयरफोन देखील 1,299 रुपयांच्या ऐवजी 1,099 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. 12 / 12OnePlus Power Bank वर देखील या अॅनिव्हर्सरी सेलमध्ये डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 1,099 रुपयांची पॉवर बँक फक्त 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.