OnePlus Band भारतात लाँच; १४ दिवसांचं बॅटरी बॅकअप आणि बरंच काही, जाणून घ्या किंमत
By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 15:33 IST
1 / 10OnePlus नं आपला पहिला फिटनेस बँड लाँच केला आहे. सर्वप्रथम कंपनीकडून हा बँड भारतात लाँच करण्यात आला आहे.2 / 10भारतात हा बँड लाँच झाल्यानंतर आता जगभरातील अन्य देशांमध्ये हा बँड लाँच केला जाईल. OnePlus Band हा भारतात Mi Smart Band 5 ला टक्कर देणार आहे.3 / 10OnePlus Band ची किंमत २ हजार ४९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. तसंच हा बँड ब्लॅक कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे.4 / 10OnePlus च्या वेबसाईटशिवाय अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या स्टोअर्समधून ग्राहकांना हा बँड करेदी करता येणार आहे. 5 / 10१३ जानेवारीपासून OnePlus Band ची भारतात विक्री सुरू करण्यात येणार आहे.6 / 10रेड क्लब मेंबर्सना OnePlus Band १२ जानेवारीपासूनच खरेदी करता येणार आहे. याव्यतिरिक्त कंपनी निरनिराळ्या रंगांमधील स्ट्रॅपचीही विक्री करणार आहे. हे स्ट्रॅप ग्राहकांना ३९९ रूपयांमध्ये खरेदी करता येतील. 7 / 10OnePlus Band मध्ये १.१ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच या डिस्प्लेचं रिझॉल्युशन १२६*२९४ इतकं असेल. याव्यतिरिक्त या बँडमधील विशेष बाब म्हणजे यात ब्लड ऑक्सिजन मॉनिटरही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात हार्ट रेट सेन्सर, जायरोस्कोपही देण्यात आले आहेत. अँड्रॉईड व्हर्जन ६ पेक्षा वरच्या कोणत्याही मोबाईलशी आणि सर्व आयओएस डिव्हाईसशी हा बँड कनेक्ट करता येईल. OnePlus Band हा OnePlus च्याच मोबाईलसह उत्तम इक्सपिरिअन्स देईल असं कंपनीचं म्हणणं आहे. 8 / 10OnePlus Band मध्ये १३ एक्सरसाईज मोड देण्यात आले आहेत. यामध्ये आऊटडोअर, इनडोअर, फॅट बर्न रन, आऊटडोअर वॉक, आउटडोअर सायकलिंह, इनडोअर सायकलिंग, एलिप्टिकल ट्रेनर, रोविंग मशीन, क्रिकेट, बॅडमिंटनस पूल स्वीमिंग, योग असे मोड्स देण्यात आले आहेत.9 / 10OnePlus Band बँडसह IP68 रेटिंगही देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त 5TM वॉटर रेझिस्टंट रेटिंगही आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं यात स्लीप ट्रॅकिंग फिचरही दिलं आहे. ते सतत SpO2 मॉनिटर करतं. तसं OnePlus Health अॅपसह हा बँड लिंक करता येऊ शकतो. यामध्ये पर्सनलाईज हार्ट रेट अलर्ट फिचरही देण्यात आलं आहे.10 / 10OnePlus Band मध्ये कनेक्टिव्हीटीसाठी Bluetooth v5.0 देण्यात आलं आहे. तसंच या बँडमध्ये नोटिफिकेशन, म्युझिक कंट्रोल, झेन मोडसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. या बँडमध्ये 100mAh ची बॅटरी देण्यात आली असून एकदा जार्ज केल्यानंतर ती १४ दिवस चालू शकेल असा दावा कंपनीनं केला आहे.