OnePlus launch its first smart TV; see the latest features and price
OnePlus चा पहिला स्मार्ट टीव्ही आला; फिचर्स पाहून डोळे विस्फारतील By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:07 PM1 / 9बऱ्याच काळापासून वनप्लस टीव्हीची जाहिरात करत होती. कंपनीने सॅमसंग आणि सोनीसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी हा टीव्ही लाँच केला आहे. नवी दिल्लीमध्ये आज लाँचिंग होते. 2 / 9चीनची प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज OnePlus 7T या मोबाईलसह पहिला वहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. OnePlus 7T मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 37999 रुपये आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने OnePlus Pay ही पेमेंट सुविधाही वनप्लसच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. 3 / 9चीनची प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज OnePlus 7T या मोबाईलसह पहिला वहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. OnePlus 7T मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 37999 रुपये आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने OnePlus Pay ही पेमेंट सुविधाही वनप्लसच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. 4 / 9OnePlus TV मध्ये 55 इंचाचा 4K QLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय पावरफूल साऊंड क्वालिटी आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टही देण्यात आला आहे. 5 / 9वनप्लसने टीव्हीची दोन मॉडेल लाँच केली आहेत. OnePlus TV Q1 ची किंमत 69900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रो मॉडेचली किंमत 99,900 रुपये ठेवण्यात आली आहे. OnePlus हा टीव्ही भारतातच प्रथम लाँच केला आहे. हा टीव्ही 28 सप्टेंबरपासून विक्रीसाठी अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. 6 / 9OnePlus TV मध्ये 55 इंचाचा 4K QLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डॉल्बी व्हिजन सपोर्टसोबत येते. 7 / 9यामध्ये OLED आणि एलईडी पॅनेलच्याजागी क्वॉन्टम डॉट डिस्प्ले टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यामध्ये छोटे छोटे डॉट्स असल्याने कलर अॅक्युरेसी जास्त आहे. रिझोल्यूशन 1920x1080 पिक्सल असून मीडियाटेक MT5670 क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढील तीन वर्षे अँड्रॉईड टीव्ही सॉफ्टवेअर मिळणार आहे. 8 / 9OnePlus TV मध्ये गॅमा कलर मॅजिक प्रोसेसर देण्यात आला आहे. 50W चे 8 स्पीकर देण्यात आले आहेत. यापैकी सहा स्पीकर पुढे आणि 2 पाठीमागे देण्यात आले आहेत. हा स्पीकर बार टीव्ही सुरू झाला की अलगद बाहेर येतो. 9 / 9हा टीव्ही वनप्लस स्मार्टफोनवरूनही कंट्रोल करता येणार आहे. गुगल असिस्टंसही असणार आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी इंटीग्रेटेड कॅमेरा देण्यात आला आहे. टीव्हीचा स्टँडही प्रिमिअम लुकचा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications