WhatsApp वर एक छोटीशी चूक अन् लाखोंचा फटका; 'या' गोष्टी पडू शकतात महागात By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 3:40 PM
1 / 15 कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडियाचा वापर हा घरबसल्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 2 / 15 एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी मोठ्याप्रमाणात अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. 3 / 15 व्हॉट्सअॅपचा वापर ही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र WhatsApp वर एक छोटीशी चूक केल्यास लाखोंचा फटका बसू शकतो 4 / 15 लॉकडाऊन दरम्यान अनेक बँकांनी आपल्या खाते धारकांना ओटीपी स्कॅमबाबत अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअॅपवर कोणत्या गोष्टी महागात पडू शकतात हे जाणून घेऊया. 5 / 15 व्हॉट्सअॅपच्या मदतीने कधीच कोणालाही बँकिंग डिटेल्स पाठवू नका. तसेच अकाऊंट संबंधित माहिती, डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा पिन नंबर किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही सांगू नका. 6 / 15 अनेकदा बँकेकडून बोलतोय अस सांगून फेक कॉल केले जातात आणि ओटीपी विचारला जातो. ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका. 7 / 15 एखाद्या अनोळखी क्रमांकावरून फाईल पाठवली असेल तर ती डाउनलोड करू नका. कदाचित ती मॅलिशस फाईल असू शकते. 8 / 15 काही वेळा फोन हरवतो तर कधी चोरीला देखील जातो. अशा वेळी फोनमधील व्हॉट्सअॅप लगेच डिअॅक्टिव्हेट करा. 9 / 15 फोन विकण्याआधी व्हॉट्सअॅप डेटा पुर्णतः क्लीअर करा. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन रिस्टोर फॅक्टरी सेटिंगने डिव्हाईस डेटा वाईप करा. 10 / 15 ऑफर्स देऊन अनेक हॅकर युजर्सना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका. 11 / 15 अनोळखी कॉन्टॅक्टने पाठवलेल्या मेसेजमध्ये अनेकदा फेक लिंक्स असतात. अशा लिंकवर क्लिक करू नका. 12 / 15 व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन ऑटोडाऊन लोड डिसेबल करा. म्हणजे नको असलेल्या फाईल्स डाऊनलोड होणार नाहीत. 13 / 15 सार्वजनिक ओपन वाय फाय नेटवर्कवर व्हॉट्सअॅपचा वापर करू नका. यामुळे हॅकिंगचा धोका हा वाढू शकतो. 14 / 15 सध्या लॉकडाऊनमध्ये खास करून नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी WhatsApp वर कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर केला जात आहे. 15 / 15 WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार आहे. युजर्सना 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर्स पाठवता येणार असून यासाठी व्हॉट्सअॅपने खास स्टिकर पॅक आणला आहे. आणखी वाचा