शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑनलाईन मागवला मोबाईल आले बटाटे; कंपनीने परत नाही दिले पैसे, जाणून घ्या, कुठे करायची तक्रार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 6:27 PM

1 / 11
ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत.
2 / 11
ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या काळात लोक ई-कॉमर्स साईटवरून मोबाईल, लॅपटॉप, फॅब्रिकसह अनेक महागड्या वस्तू ऑर्डर करतात. मात्र, यासोबतच फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या जागी दुसरे काही उत्पादन आढळून आल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
3 / 11
काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉक्स रिकामा आढळला तर काही यात साबण, दगड किंवा बटाटे आढळले. ऑनलाईन फसवणुकीशी संबंधित अशा तक्रारी देशभरातून येत असतात. वास्तविक, अशा फसवणुकीच्या घटनांसाठी विक्रेता, शिपिंग कंपनी किंवा इतर कोणीही जबाबदार असू शकतात.
4 / 11
सर्वाधिक नुकसान यामध्ये ग्राहकांचेच होते. कारण मालही वेळेवर मिळत नाही आणि रिफंड मिळण्यासाठी त्रासदायक प्रक्रियेला सामोरे जावे लागते. तुम्हीही अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडला असाल आणि तुम्हाला पैसे परत मिळण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.
5 / 11
सर्वप्रथम तुम्हाला ई-कॉमर्स साइट किंवा विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता. मात्र, निर्धारित वेळेत तुमची समस्या दूर झाली नाही, तर तुम्ही पुढे तक्रार करू शकता. जर तुम्ही बनावट किंवा बोगस साइटवरून खरेदी केली असेल तर पैसे मिळणे जवळजवळ अशक्य होते.
6 / 11
ई-कॉमर्स वेबसाईटची तक्रार निवारण यंत्रणा काम करत नसेल तर कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर तक्रार करण्यास अजिबात संकोच करू नका. याशिवाय, सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल INGRAM (Integrated Grievance Redressal Mechanism) वर तक्रार दाखल करा.
7 / 11
Consumerhelpline.gov.in या ग्राहक व्यवहार साइटवरही तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहक न्यायालयांनी ग्राहकांच्या हिताचे जलद निर्णय दिले असून निष्काळजीपणासाठी कंपन्यांना दंडही ठोठावला आहे.
8 / 11
नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन सल्ला देते की चुकीचे व्यवहार किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास, कंपनी शोधता येत नसल्यास, ग्राहकाने एफआयआर दाखल करावा किंवा पोलीस किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी.
9 / 11
ऑनलाईन फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाजारात सध्या असलेल्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करणे. याचा फायदा असा होईल की तुम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. अनेक फेक वेबसाईट्स पासून सावध राहा, तसेच खरेदी करताना काळजी घ्या.
10 / 11
गेल्या काही काळापासून लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ पाहता सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. स्वस्त दरात मोबाईलचे आमिष दाखवून डिलिव्हरीच्या वेळी पाकिटांमध्ये बटाटे आणि दगड देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबईत जुलै महिन्यात पर्दाफाश झाला.
11 / 11
उत्पादनाची ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर, डिलिव्हरीच्या वेळी सर्वप्रथम डिलिव्हरी बॉयसमोर आपलं पार्सल उघडून पाहा आणि उत्पादनाची नीट तपासणी करा. जेणेकरून फसवणूक झाली असेल तर लगेचच तक्रार करायला हरकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :onlineऑनलाइनShoppingखरेदी