oppo records rupees 2300 crore sales from F19 Pro series in 3 days
Mi, Samsung नाही, तर 'या' कंपनीचा धडाका; ३ दिवसांत २,३०० कोटींची मोबाइल विक्री By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 4:09 PM1 / 11गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांचे अनेकविध स्मार्टफोन बाजारात येत आहेत. Redmi, xiomi, samsung, apple, asus, one plus यांसारख्या कंपन्यांमध्ये चढाओढ असलेली आपल्याला दिसते. 2 / 11अत्याधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीत जास्त वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स ऑफर केले जात आहेत. 3 / 11स्मार्टफोन कंपनी Oppo ने काही दिवसांपूर्वीच भारतीय मार्केटमध्ये आपली लेटेस्ट ओप्पो एफ१९ सीरिज लाँच केली. या सीरिजमध्ये कंपनीने Oppo F19 Pro+ आणि Oppo F19 Pro हे दोन स्मार्टफोन आणले असून, याला भारतीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 4 / 11लाँचिंगनंतर पहिल्या सेलच्या सुरूवातीच्या तीन दिवसांमध्येच कंपनीने भारतात एफ१९ सीरिजच्या तब्बल २,३०० कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री केली आहे.5 / 11ओप्पो कंपनीकडून बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे. सेलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या विक्रीने यापूर्वीच्या सर्व ओप्पो फोनच्या विक्रीचा रेकॉर्ड मोडल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.6 / 11ओप्पो एफ१९ सीरिजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप, सुपर अॅमोलेड डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे अनेक फिचर्स आहेत. याशिवाय, प्रो प्लस व्हेरिअंटमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट, तर प्रो मॉडेल ४जी व्हेरिअंटमध्ये आहे. 7 / 11Oppo F19 Pro+ मध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ८००यू ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.8 / 11Oppo F19 Pro+ मध्ये मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यात अनेक मोड असून सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सरही आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला असून, ४३१० mAh क्षमतेची बॅटरी ऑफर केली जाते. 9 / 11Oppo F19 मध्ये ६.४३ इंचाचा डिस्प्ले, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली ४३१० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 10 / 11फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यात अनेक मोड असून सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सरही आहे. ओप्पो एफ१९ प्रो प्लसच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत २५ हजार ९९० रुपये आहे.11 / 11F19 Pro च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत २१ हजार ४९० रुपये आहे. टॉप व्हेरिअंट ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत २३ हजार ४९० रुपये आहे. फ्लुएड ब्लॅक आणि स्पेस सिल्वर अशा दोन रंगाच्या पर्यायांमध्ये दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications