paytm launches credit card with cash back offers
Paytm कडून क्रेडिट कार्ड लाँच, प्रत्येक ट्रांजक्शनवर मिळणार कॅशबॅक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 3:54 PM1 / 9पेटीएम (Paytm) कंपनीने भारतात क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या क्रेडिट कार्डवरील प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक ऑफर उपलब्ध असणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.2 / 9कंपनी नेक्स्ट जनरेशन क्रेडिट कार्ड लाँच केले असून पुढील १२-१८ महिन्यांत पेटीएमचे लक्ष्य २० लाख कार्ड देण्याचे आहे, असे पेटीएमने म्हटले आहे.3 / 9पेटीएमच्या म्हणण्यानुसार, कंपनी क्रेडिट कार्डसाठी अनेक कार्ड देणार्या ब्रँडसोबत भागीदारी करत आहे. ज्या अंतर्गत को-ब्रँड कार्ड जारी करण्यात येतील.4 / 9पेटीएम क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील डिजिटल असणार आहे. पेटीएम अॅपवर कार्डसाठी एक डेडिकेटेड सेक्शन असणार आहे. या सेक्शनमधून युजर्स कार्ड मॅनेज करू शकतात.5 / 9अॅपच्या माध्यमातून तुम्ही पेटीएम क्रेडिट कार्डचा पिन बदलू शकता आणि अॅड्रेस अपडेट करून शकता. तसेच, कंपनीने म्हटले आहे की, युजर्स त्यांचे क्रेडिट कार्डला रिअल टाइम मॅनेज करू शकतील.6 / 9क्रेडिट कार्डसह फसवणूक झाली तर विमा देखील दिला जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासह (ट्रान्जक्शन) ग्राहकांना कॅशबॅक मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. 7 / 9कॅशबॅक पेटीएम गिफ्ट व्हाउचरच्या म्हणून देण्यात येणार आहे, ज्याचा पेटीएम इकोसिस्टममध्ये वापरला जाऊ शकतो.8 / 9पेटीएम क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी, कंपनी ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअर आणि पेटीएम व्यवहार इतिहास/खरेदी पॅटर्नला आधार बनवणार आहे.9 / 9पेटीएम क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील डिजिटल असणार आहे. पेटीएम अॅपवर कार्डसाठी एक डेडिकेटेड सेक्शन असणार आहे. या सेक्शनमधून युजर्स कार्ड मॅनेज करू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications