शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pee Power: आता युरिननं चार्ज होणार मोबाइल फोन, TV ही चालणार! वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 6:33 PM

1 / 8
फोन चार्ज करण्यासाठी अथवा टीव्ही चालविण्यासाठी आता तुम्हाला विजेची गरज भासणार नाही. कारण आता तुम्हाला तुमच्या युरीनपासून (Pee Power) घरात हवी तेवढी वीज निर्माण करणे शक्य होणार आहे.
2 / 8
वैज्ञानिकांचं संशोधन यशस्वी - डेली स्टारच्या वृत्तानुसार, युरिनपासून निर्माण होणाऱ्या विजेवरील वैज्ञानिकांचे संशोधन यशस्वी झाले आहे. यासोबतच भविष्यात लोकांना सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेबरोबरच युरिनपासून वीज बनविण्याचा पर्यायही मिळेल. महत्वाचे म्हणजे हा ऊर्जेसाठी एक स्वच्छ पर्याय तर असेलच, पण अत्यंत स्वस्त पर्यायही असले.
3 / 8
युरिनपासून घरच्या घरीही तयार करता येईल वीज - इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील संशोधकांच्या एका चमूने मानवी मलमूत्र आणि युरिनपासून तयार होणाला नवा स्वच्छ ऊर्जा इंधन सेल विकसित केले आहे. हा सेल मानवी मलमूत्राचे विजेत रुपांतर करू शकतो. या सेलपासून बनवलेल्या विजेपासून (Pee Power) तुम्ही दिवसभर घरात वीज वापरू शकता, असा दावा करण्यात येत आहे.
4 / 8
2 वर्षांपूर्वीच सुरू झाला होता प्रोजेक्ट - वृत्तानुसार, हा Pee Power प्रोजेक्ट 2 वर्षांपूर्वी Glastonbury festival मध्ये सर्वांसमोर दाखविण्यात आला होता. तेथे, टॉयलेट्सच्या युरिनपासून वीज निर्माण केली जाऊ शकते, हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले होते. यानंतर युरिनपासून वीज निर्माण करून मोबाइल फोन, लाइट आणि टीव्ही चालविण्याच्या मिशनवर काम सुरू झाले.
5 / 8
300 वॅट वीज निर्माण करण्यात मिळाले यश - Bristol बायो एनर्जी सेंटरच्या वैज्ञानिकांच्या मते, 5 दिवस चाललेल्या फेस्टिव्हलमध्ये आलेल्या लोकांनी टॉयलेटमध्ये जेवढी युरिन केली, त्यापासून 300 वॅट प्रति तास वीज जनरेट करण्यात यश मिळाले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, युरिनपासून जनरेट करण्यात आलेल्या या विजेपासून आपल्याला 10 वॅट क्षमतेचा बल्ब 30 तासांपर्यंत चालवता आला असता.
6 / 8
करण्यात आला Microbesचा वापर - वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात डोळ्यांनाही दिसणार नाहीत अशा, अत्यंत सूक्ष्म जीव Microbes चा वापर करण्यात आला. वैज्ञानिकांनी एक बॉक्ससारख्या सेलला Microbes ने भरले. हे Microbes गवत, मानवी युरिनसह कुठल्याही ऑर्गेनिक गोष्टी खाऊन त्याचे रुपांतर विजेत करतात. वीज तयार झाल्यानंतर उरलेले अवशेष खत म्हणून वापरता येतात.
7 / 8
एका व्यक्तीकडून रोजची अडीच लीटर युरिन - वृत्तानुसार, प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी अडीच लिटर युरिन तयार करते. कुटुंबात जर चार लोक असतील, तर रोजाची किमान 10 लिटर युरिन एकत्र होईल. एवढी युरिन Microbial Fuel Cell ला काम करण्यासाठी आणि सातत्याने वीज जनरेट करण्यासाठी पुरेशी आहे.
8 / 8
अर्थात, योणाऱ्या काळात आपले कुटुंब घरच्यांच्या युरिनपासूनच वीज तयार करून टीव्ही, बल्ब आणि मोबाइल चार्ज करण्यासोबतच विजेची इतरही कामे करू शकते.
टॅग्स :electricityवीजMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान