स्मार्टफोनसाठी क्रेझी असाल तर 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 18:17 IST
1 / 6स्मार्टफोनचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो मात्र स्मार्टफोनचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. या गोष्टींविषयी जाणून घेऊया.2 / 6ऑटोमॅटीक सायलेंट मोड - स्मार्टफोनमधील या मोडचा वापर हा महत्त्वाची मीटींग, थिएटर, मंदिर, वाचनालय यासारख्या अनेक ठिकाणी प्रामुख्याने करता येतो. यासाठी फोनमधील सेटींगमध्ये जाऊन साऊंड सेटींगमध्ये डू नॉट डिस्टर्ब ही सेटींग सिलेक्ट करा.3 / 6घरामध्ये स्मार्टफोन नेहमी अनलॉक ठेवा. यासाठी स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये सिक्यूरिटी आणि लोकेशन सेटींगमध्ये जाऊन स्मार्टलॉकवर क्लिक करा. 4 / 6स्मार्टफोनमध्ये विविध गोष्टी असल्याने स्पेस कमी असते अशा वेळी फोनमधील सर्व फोटो आणि व्हिडीओ क्लाऊडवर सेव्ह करू शकता. त्यासाठी फोटो अॅप सेटींगमध्ये जाऊन बॅकअप ऑन करणं गरजेचं आहे. 5 / 6ड्रायविंग करताना ऑटोमॅटीक रिप्लाय - फोन स्मार्ट झाले असून तुम्ही ड्रायविंग करत आहात हे ते डिटेक्ट करतात. यासाठी अॅन्ड्रॉईड ऑटो प्ले स्टोर ही सेटींग डाऊनलोड करून सेटींगमध्ये जाऊन ऑटो लॉन्च ऑन करणं गरजेचं आहे. 6 / 6स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. IFTTT हे अॅप डाऊनलोड करून स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर सेटींगमध्ये काही बदल करून तुम्ही तुमच्या दिवसभरातील अनेक गोष्टींची माहिती घेऊ शकता.