शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mobile SIM Fraud: सावधान! तुमच्या नावे 9 बनावट सिम असू शकतात; दहशतवाद, गुन्ह्यांसाठी वापर, असे करा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 9:05 AM

1 / 11
नवी दिल्ली : जेव्हा तुम्ही नवीन सिम खरेदी करता, तेव्हा तुम्हाला फोटो आणि ओळख पत्रासाठी ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदार ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी द्यावी लागते. मात्र, अनेकदा स्थानिक सिम प्रोव्हायडर तुमच्या या फोटोसह कागदपत्रांचे बनावट कॉपी तयार करतात आणि तुमच्या नावे अनेक सिम बाजारात विकतात. असे अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. (How to block Fake SIM, Fake mobile number on your name)
2 / 11
अशा या बनावट सिमवरून गुन्हे घडविले किंवा केले जातात. यामध्ये बॉम्बस्फोटासारखी दहशतवादी कृत्येदेखील केली जातात. अशा गुन्ह्यांत पोलीस तुमच्यापर्यंत येतात. अनेकदा काही संबंध नसताना केवळ तुमच्यानावे सिम आहे म्हणून तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. यामुळे तुमच्या नावे अशी किती सिम आहेत याचा शोध घेता येणार आहे. ही बनावट सिमकार्ड सरकारी पोर्टलवरून ब्लॉकही करता येतात. चला जाणून घेऊया कसे करायचे....
3 / 11
दूरसंचार विभागाने tafcop.dgtelecom.gov.in डोमेनचे एक पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलमध्ये देशभरात सुरु असलेल्या सर्व मोबाईल नंबरचा डेटा अपलोड केलेला आहे. आ पोर्टलच्या मदतीने स्पॅम आणि फ्रॉडवर लगाम लावण्याचा प्रयत्न करण्य़ात आला आहे.
4 / 11
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नावेदेखील अन्य कोणतरी मोबाईल नंबर वापरत आहे, तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता. तुमच्या माहितीसाठी, एका सिमचे ९ बनावट सिम बनविले जातात. यामुळे कोणतीही रिस्क न घेता, पुढील धोके टाळण्यासाठी बनावट सिम कार्ड ब्लॉक करणे कधीही चांगले.
5 / 11
तुम्हाला tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल.
6 / 11
इथे गेल्यावर तुम्हाला तुमचा 10 अंकांचा मोबआईल नंबर टाकावा लागणार आहे.
7 / 11
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल.
8 / 11
हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय होईल.
9 / 11
यानंतर तुमच्या लॉगिनमध्ये तुमच्या नावावर चालू असलेल्या मोबाईल नंबरची लिस्ट येईल. जे तुमच्या आयडीवर चालू असतील.
10 / 11
तुम्ही जे नंबर तुम्हाला माहिती नाहीत किंवा बनावट वाटतात त्यांची तक्रार करू शकणार आहात.
11 / 11
सरकार तुमच्या या बनावट नंबरचा तपास करेल. हा नंबर जर तुमच्या आयडीवर चालू असल्याचे दिसले तर तो ब्लॉक केला जाणार आहे.
टॅग्स :fraudधोकेबाजीMobileमोबाइल