शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या दमदार फोन्सच्या किंमती 4 हजारांपर्यंत घटल्या....पहा कोणते फोन आहेत ते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 7:01 PM

1 / 7
स्मार्टफोन्स आज प्रत्येकाची गरज बनले आहेत. स्मार्टफोनशिवाय कोणतीच कामे होत नाहीत. काही फोन लाँच झाल्यानंतर थोडे महाग वाटतात खरे, पण काही महिने थांबल्यास या फोनची किंमत कमी होते. अशावेळी हे फोन खरेदी करणे फायद्याचे ठरते...चला जाणून घेऊयात कोणत्या फोनची किंमत उतरली ते....
2 / 7
मोटोरोलाने जी सिरिजमध्ये ड्युअल कॅमेरा असलेला जी5 एस हा फोन लाँच केला होता. गेल्या वर्षी या फोनची किंमत 16999 होती. यात 4 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हा फोन 12999 रुपयांना मिळतोय.
3 / 7
नोकियाने आपल्या नुकत्याच लाँच झालल्या Nokia 6.1 फोनची किंमत 1500 रुपयांनी घटविली आहे. 3 जीबी आणि 4 जीबी व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 15499 आणि 17499 असणार आहे.
4 / 7
सॅमसंगने नुकताच लाँच केलेला गॅलॅक्सी जे 4 ची किंमत उतरवली आहे. कंपनीने जूनमध्ये हा फोन 11990 रुपयांमध्ये लाँच केला होता. या मोबाईलची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
5 / 7
व्हिवोने आणखी एक फोन व्ही9 ची किंमत 2 हजार रुपयांनी घटविली आहे. या फोनची किंमत 22990 रुपये होती. जुलैमध्ये 2000 रुपयांनी किंमत घटविण्य़ात आली होती. आता पुन्हा 2 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. आता हा फोन 18,990 रुपयांना घेता येऊ शकेल.
6 / 7
व्हिवोने आपला प्रिमियम श्रेणीतील स्मार्टफोन एक्स 21 ला 35,990 रुपयांना बाजारात उतरवले होते. इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर फीचर सोबत आलेला हा भारतातील पहिला फोन आहे. या फोनची 4000 रुपयांनी घटून किंमत 31990 रुपये झाली आहे.
7 / 7
व्हिवो Vivo कंपनीने आपल्या वाय 83 या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.जूनमध्ये या फोनची किंमत 14999 होती. त्यात कंपनीने 1 हजार रुपयांची घट केली आहे. आता हा फोन 13999 रुपयांना मिळत आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.
टॅग्स :Mobileमोबाइलsaleविक्री