शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PUBG Mobile पुन्हा भारतात येणार? एका पोस्टमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 11:27 PM

1 / 7
PUBG हा भारतात खूप लोकप्रिय मोबाईल गेम ठरला. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी भारत सरकारने PUBG मोबाईलवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता PUBG मोबाईलवरील बंदी कधी हटविण्यात येणार? की बंदी कायम ठेवण्यात येणार आहे, याबाबत कोणतीच माहिती नाही.
2 / 7
यातच, आता PUBG कॉर्पोरेशनकडून एका पदासाठी नोकरीची जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे काहीजण भारतातील PUBG वरील बंदी उठविण्याचे संकेत असल्याचे मानत आहेत. मात्र, या नोकरीच्या पदावरून मोबाईलमध्ये PUBG पुन्हा येईल असे गृहीत धरले जाऊ शकत नाही.
3 / 7
लोकप्रिय बॅटल रॉयल गेम PUBG चे डेव्हलपर आणि पब्लिशर PUBG कॉर्पोरेशनकडून लिंक्डइनवर नोकरीसंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट 'कॉर्पोरेट डेव्हलपमेंट डिव्हिजन मॅनेजर' या पदासाठी आहे.
4 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, PUBG कॉर्पोरेशन एका व्यक्तीच्या शोधात आहे. जो भारतीय मार्केटमध्ये फोकस करून मर्जर, अॅक्विजिशन आणि इन्वेस्टमेंटसाठी ओव्हरऑल स्ट्रेटेजी डेव्हलप करेल.
5 / 7
याचबरोबर, या पदाच्या उमेदवाराला दक्षिण कोरियामधील क्राफ्टनच्या मुख्यालयाच्या मार्गदर्शनासह PUBG इंडियाच्या सेटअप प्रोसेसला सपोर्ट करावे लागेल.
6 / 7
दरम्यान, या माहितीच्या आधारावर काही लोकांकडून भारतात PUBG मोबाईल परत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या नोकरीसाठी फक्त PUBG असे लिहिले असून PUBG मोबाईल असे लिहिले नाही.
7 / 7
भारत सरकारने गेल्या दिवसांपूर्वी देशात PUBG मोबाईलवर बंदी घातली आहे. मात्र, भारतात PC आणि गेमिंग कन्सोलवर उपलब्ध असलेल्या PUBG ला अॅक्सेस करता येऊ शकते.
टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान