QR Code Payment: Be careful when scanning QR codes; account emptying by Hacker pdc
QR Code Payment: जेवढे सोयीचे, तेवढेच धोक्याचे! क्यूआर कोड स्कॅन करताना सावध; खाते रिकामे होण्याची भीती By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 1:02 PM1 / 7क्यूआर कोड स्कॅन करून पटापट खरेदी करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अगदी छोट्यातील छोटी रक्कमही क्यूआर कोड स्कॅन करून अदा केली जात आहे. पण यातील धोकाही तेवढाच असून, त्याबाबत सावध न राहिल्यास खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. या कामात तरबेज असणारे हॅकर अगदी काही मिनिटांत तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.2 / 7आपण जर सावध नसाल आणि ज्या ठिकाणी पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला तर बॅंकेतून सगळीच रक्कम जाऊ शकते.3 / 7हॅकरद्वारे असे क्यूआर कोड तयार केले जातात. त्यासाठी सावध राहून पेमेंट करावे लागते.4 / 7पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करू नका. तुम्हाला पैसै घ्यायचे असल्यास रोख घ्या किंवा इतर माध्यमातून घ्या. कारण पैसे घेण्यासाठी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करण्याची कधीच गरज नसते.5 / 7एखादा व्यक्ती तुम्हाला पैसे स्वीकारण्यासाठी एखादा क्यूआर कोड स्कॅन करायला सांगत असेल, तर तसे अजिबात करू नका. यामागे फ्रॉड दडलेले असू शकते.6 / 7सध्या शॉपिंगवेळी, भाजीच्या दुकानात किंवा मग कोणत्याही दुकानात रोख पैसे अदा करण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅनच्या माध्यमातून पेमेंट करणे अधिक पसंत करू लागलो आहोत.7 / 7क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ज्या व्यक्तीला पेमेंट करणार आहोत त्याच्याशी संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपण कोणत्या नावावर पेमेंट करत आहोत, त्याची माहिती दाखवली जाते. त्याची खातरजमा करूनच पिनकोड टाकावा. आणखी वाचा Subscribe to Notifications