Realm will bring 64 MP camera first in India; See a photo taken from a 64-megapixel camera
रिअलमी भन्नाट कॅमेराचा फोन आणणार; पहा 64 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातून काढलेला फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 8:08 PM1 / 5सध्या सर्वत्र सोनीचा 48 मेगापिक्सलच्या सेन्सरची चर्चा आहे. वनप्लसनंतर शाओमीने दोन फोन लाँच केले आहेत. तर गुगलचा पाठिंबा असलेल्या मोटरोलानेही नुकताच 48 मेगापिक्सलच्या सेन्सरचा फोन कमी किंमतीत लाँच केला आहे. मात्र, या कॅमेऱ्याला टक्कर सोडाच त्याच्याही पुढचा असलेला फोन रिअलमी लाँच करणार आहे. तेही पहिल्यांदा भारतात. मग आहे ना फोटोग्राफर्ससाठी मोठी पर्वणी...2 / 5Realme Mobilesचे भारतातली सीईओ माधव सेठ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून हा एकदम झक्कास फोटो Samsung GW1 च्या 64 मेगापिक्सलच्या सेन्सरने घेतल्याचा दावा केला आहे. हा फोटो लँडस्केप मोडवर घेण्यात आला आहे. तसेच या सेन्सरचा पहिला वहिला फोन भारतात लाँच केला जाणार असल्याचे सेठ यांनी म्हटले आहे. 3 / 5सॅमसंगने सोनीच्या 48 मेगापिक्सल कॅमेराचे फोन लाँच झाल्यानंतर लगेचच या 64 मेगापिक्सलच्या कॅमेराची घोषणा केली होती. तसेच आजपर्यंतचा उच्चतम रिझोल्युशनचा सेन्सर असल्याचे म्हटले होते. या सेन्सरमध्ये 1.6 मायक्रॉन पिक्सल आहेत. 1/1.72 इंचाच्या सेन्सर आणि कमी पिक्सलमुळे हा फोन अंधारातही चांगले फोटो खेचण्याची क्षमता ठेवतो. हा सेन्सर सॅमसंगच्या टेट्रासेल प्रणालीवर काम करतो. हा सेन्सर 100 db पर्यंत रिअल टाईम HDR चे फोटो काढू शकतो. याशिवाय सेन्सरमधून 1080p स्लो- मोशन व्हिडीओही घेता येतो. 4 / 5लो लाईटमध्ये या कॅमेराद्वारे 16 मेगापिक्सलचे फोटो घेता येतील. तर प्रकाशात 64 मेगापिक्सलचे फोटो काढतो येऊ शकतात. 4 पिक्सलला एकामध्ये एकत्र करण्यात येते.5 / 5हा आहे 64 मेगापिक्सलच्या कॅमेरातून काढलेला भन्नाट फोटो. आणखी वाचा Subscribe to Notifications