शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धमाकेदार सूट! 3000 रुपयांमध्ये Realme चा दमदार 5G फोन होईल तुमचा; आजपासून सुरु होणार सेल

By सिद्धेश जाधव | Published: February 23, 2022 11:59 AM

1 / 11
हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेटसह प्रीमिमय मिड रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम देण्यात आला आहे.
2 / 11
Realme 9 Pro 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
3 / 11
Realme 9 Pro 5G स्मार्टफोन ऑरोरा ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि सनराइज ब्लू शेड्समध्ये कंपनीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून आज दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.
4 / 11
Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.
5 / 11
कंपनीनं याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
6 / 11
Realme 9 Pro फोन अँड्रॉइड 12 आधारित Realme UI 3.0 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 5G चिपसेटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU मिळतो.
7 / 11
रियलमीचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.
8 / 11
Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64MP चा प्रायमरी सेन्सर आहे. सोबत 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 MP ची लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
9 / 11
या रियलमी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा फोन 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
10 / 11
Realme 9 Pro 5G स्मार्टफोन एचडीएफसी बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर फ्लिपकार्ट 4,000 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट देत आहे.
11 / 11
तुम्ही Realme 9 Pro 5G स्मार्टफोन ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता. बजाज फिनसर्व आणि निवडक क्रेडिट कार्डसवर नो-कॉस्ट ईएमआय मिळेल. या हप्त्यांची सुरुवात 3,000 रुपयांपासून होते.
टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान