शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 9 मिनिटांत फोन फूल चार्ज, Realme ने लॉन्च केला जबरा फोन; पाहा किंमत आणि फीचर्स ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 3:09 PM

1 / 7
Realme GT 3 : Realme ने जगातील सर्वात वेगाने चार्ज होणार स्मार्टफोन Mobile World Congress म्हणजेच MWC 2023 मध्ये लॉन्च केला आहे. Realme GT सीरीजच्या या लेटेस्ट स्मार्टफोनला 5 रॅम आणि स्टोरेज ऑप्शन्स देण्यात आले आहेत. याची खासियत म्हणजे, या फोनला 240 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2 / 7
डिस्प्ले आणि सॉफ्टवेयर: फोनमध्ये 6.74 इंच 1.5K अॅमोलेड डिस्प्ले आहे, जी 360 हर्ट्ज टच सँपलिंग रेट, 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 93.69 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोसह येते. या फोनमध्ये 1400 निट्सची पीक ब्रायटनेसदेखील मिळेल. फोन अँड्रॉइड 13 वर आधारित रियलमी यूआय 4.0 वर काम करेल.
3 / 7
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या नवीन रियलमी जीटी3 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरेशन ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे.
4 / 7
कॅमेरा: फोनच्या बॅक पैनेलवर तीन रिअर कॅमरे आहेत, ज्यात 50 मेगापिक्सल Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर मिळेल. याशिवाय, यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील दिला आहे.
5 / 7
बॅटरी: रियलमी जीटी 3 मध्ये 4600 एमएएचची बॅटरी दिली आहे, जी 240 वॉट सुपरवूक फास्ट चार्ज सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, हा फोन फक्त 9 मिनीट 30 सेकंदामध्ये फुल चार्ज होतो.
6 / 7
स्टोरेज: या फोनचे पाच व्हेरिएंट्स आहेत, ज्यात 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम/256 जीबी, 16 जीबी रॅम/256 जीबी, 16 जीबी रॅम/512 जीबी आणि 16 जीबी रॅम/1 टीबी स्टोरेज असेल.
7 / 7
किंमत: या फोनची किंमत 649 डॉलर (सूमारे 53 हजार 500 रुपये) आहे. इतर व्हेरिएंट्सची किंमत अद्याप समोर आलेली नाही. हा फोन पल्स व्हाइट आणि बूस्टर ब्लॅक कलरमध्ये मिळेल.
टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान