Realme Smartphones Under 15000 On Discount In Flipkart Mobile Bonanza Sale
15 हजारांच्या आत येणाऱ्या ‘हे’ Realme स्मार्टफोन मिळतायत स्वस्तात; 6000mAh बॅटरी, 8GB रॅमवरही आहे डिस्काउंट By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 1:08 PM1 / 6फ्लिपकार्ट मोबाईल बोनांझा सेल 9 ते 14 फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणार आहे. या सेलमध्ये रियलमीच्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. ज्यात 15000 रुपयांच्या आत येणाऱ्या मॉडेल्सचा समावेश आहे. 2 / 6या फोनची किंमत 15999 रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात MediaTek Helio G95 प्रोसेसरच्या पावरसह 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 3 / 6या फोनला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 6.6 इंचाचा डिस्प्ले, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळते. यात 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत, ज्यांची किंमत 13999 रुपयांपासून सुरु होते. 4 / 6Realme Narzo 50A मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. MediaTek Helio G85 प्रोसेसरसह येणार हा फोन 4GB RAM आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची आरंभिक किंमत 11499 रुपये आहे. 5 / 6स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 50MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी मिळते. Unisoc T618 प्रोसेसरसह स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 10999 रुपयांपासून सुरु होते. 6 / 6हे सर्व रियलमी फोन्स Citi बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास फ्लिपकार्टकडून डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही जुना फोन देऊन 14450 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तर ईएमआय ऑप्शन्सची सुरुवात 382 रुपयांपासून होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications