शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio ने मारली पुन्हा बाजी! Vi आणि Airtel ला धोबीपछाड; 4G स्पीडमध्ये अव्वल स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 5:20 PM

1 / 10
Reliance Jio ने जेव्हापासून टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून अन्य टेलिकॉम कंपन्यांमध्ये टिकून राहण्याची तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. व्होडाफोन आणि आयडियाने एकत्र येत Vi ही सुरू केली.
2 / 10
मात्र, तरीही टेलिकॉम क्षेत्रात Jio चा दबदबा कायम असून, सप्टेंबर महिन्याची आकडेवारी TRAI जाहीर केली असून, Vi आणि Airtel ला धोबीपछाड दिल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 10
टेलिकॉम कंपनी Jio ला आपले स्थान बळकट कसे करायचे हे चांगलेच माहिती आहे. जिओ कंपनीने सप्टेंबर महिन्यात २०.९ मेगाबिट प्रति सेंकद (MBPS) च्या स्पीडची सरसरी डाउनलोड दर सोबत ४ जी स्पीड चार्ट मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
4 / 10
TRAI च्या माहितीनुसार, Vi हे ७.२ एमबीपीएस डेटा स्पीड सोबत अपलोड सेगमेंट मध्ये टॉपवर आहे. सप्टेंबर महिन्यात Jio चे ४ जी नेटवर्क स्पीडमध्ये जवळपास १५ टक्के वाढ झाली आहे.
5 / 10
Airtel आणि Vi च्या स्पीड अनुक्रमे दर महिन्याला जवळपास ८५ टक्के आणि ६० टक्के राहिली आहे. तर याच्या स्पीडमध्ये अनुक्रमे ११.९ एमबीपीएस आणि १४.४ एमबीपीएस झाली आहे. डाउनलोड स्पीड युजर्सला इंटरनेटने कॉंटेटला अॅक्सेस करण्यास मदत मिळते.
6 / 10
तसेच अपलोड स्पीड युजर्संना आपल्या कॉन्टॅक्ट सोबत फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यास किंवा शेयर करण्यास मदत करते. सप्टेंबरमध्ये तीन टेलिकॉम प्रायव्हेट ऑपरेटराच्या ४ जी अपलोड स्पीडमध्ये सुधारणा पाहिली होती.
7 / 10
Vi चा सप्टेंबर महिन्यात सरासरी अपलोड स्पीड ७.२ एमबीपीएस होता. यानंतर Reliance Jio चा अपलोड स्पीड ६.२ एमबीपीएस आणि भारती एयरटेलचा ४.५ एमबीपीएस होता.
8 / 10
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने काही निवडक क्षेत्रात ४ जी सर्विस सुरू केली आहे. परंतु, याच्या नेटवर्क स्पीड ट्राय चार्टमध्ये नव्हते. याची मोजणी ट्रायकडून रियल टाइमच्या आधारावर आपल्या माय स्पीड अप्लिकेशनच्या मदतीने करण्यात आली आहे.
9 / 10
संपूर्ण भारतात मिळवण्यात आलेल्या डेटाच्या आधारावर हा डेटा जारी करण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरला सकाळी काही वेळासाठी रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याची माहिती समोर आली होती. नेटकऱ्यांनी ट्विटरवर #jiodown ट्रेंड देखील केला होता.
10 / 10
ग्राहकांना झालेल्या असुविधेची भरपाई म्हणून कंपनीने ही ऑफर सादर केली आहे. बुधवारी रिलायन्स जिओचे नेटवर्क मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये डाउन झाल्याची तक्रार ग्राहकांनी ट्विटरवरून केली होती.
टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलBSNLबीएसएनएल