1 / 10Reliance Jio ने शनिवारी आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर जाहीर केली आहे. यानुसार Emergency Data Loan सुविधा दिली जाणार आहे. (Reliance Jio Emergency Data loan facility on My Jio app in 5 easy steps)2 / 10मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सच्या या कंपनीने करोडो ग्राहकांसाठी Recharge now Pay Later ही सुविधा आज लाँच केली आहे. 3 / 10नव्या ऑफरनुसार जिओ युजर इन्स्टंट डेटा लोन घेऊ शकणार आहेत आणि नंतर पैसे चुकते करू शकणार आहोत. यामुळे अडचणीच्या वेळी, पैसे देण्याचे साधन नसल्यास आपत्कालीन इंटरनेट मिळणार आहे. 4 / 10Recharge Now And Pay Later मध्ये ग्राहकांना एका निश्चित कालावधीपर्यंत पैसे भरता येणार आहेत. ही सेवा डेली डेटा संपल्यानंतर लगेचच रिचार्ज करण्यास सक्षम नाहीत त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. 5 / 10महत्वाचे म्हणजे जिओ प्रिपेड युजरसाठी १ जीबी पर्यंतचा डेटा पाचवेळा घेता येणार आहे. १ जीबी डेटाची किंमत ११ रुपये आहे. 6 / 10माय जिओ My jio अॅपवर जावे. डाव्या बाजुला वर मेनूवर क्लिक करावे. 7 / 10आता मोबाईल सव्हिसेस Mobile Servicesमध्ये दिसणाऱ्या Emergency Data Loan ला निवडावे. 8 / 10Emergency Data Loan वर Proceed बटन दिसेल त्यावर क्लिक करावे. 9 / 10यानंतर Get Emergency Data ऑप्शन सिलेक्ट करावा. तिथे Activate Now वर क्लिक करावे. 10 / 10यानंतर तुम्हाला इमरजन्सी डेटा मिळण्यास सुरुवात होणार आहे. घरून काम करणाऱ्यांसाठी हे फायद्याचे आहे.